Marathi News Sports Cricketer actor mahesh manjrekar trained by ramakant acharekar kapil dev lalchand rajput
मुंबईच्या दिग्गजांबरोबर खेळला, सचिनच्या कोचकडूनच शिकला, कपिलदेवसमोर फिफ्टी ठोकली, मग महेश मांजरेकरने क्रिकेट का सोडलं?
दिग्दर्शक तसेच एक अभिनेता म्हणून महेश मांजरेकरांनी एकामागोमाग एक हिट सिनेमे दिले. आज कला क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. (Mahesh Manjrekar trained by Ramakant Acharekar kapil Dev lalchand Rajput)
1 / 11
महेश मांजरेकर यांना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून ओळखलं जातं. ते जे काम करतील त्या कामांना लोकं भरभरुन दाद देतात. प्रत्येक काम ते तितक्याच मेहनतीने करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की महेश मांजरेकर यांना क्रिकेटपटू व्हायचं होते.... यापेक्षा अधिक स्पष्टपणे सांगायचे झालं तर त्याला फलंदाज व्हायचं होतं, पण असं काहीतरी घडलं की महेशने क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्राचा रस्ता धरला. महेश मांजरेकर यांनी स्वत: याबद्दल सांगितलं आहे...
2 / 11
महेश भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंसह खेळला आहे. तो लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित यासारख्या खेळाडूंसोबत खेळायचा. त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर होते, ज्यांनी सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवले, ते जगातील एक महान प्रशिक्षक होते.
3 / 11
25 एप्रिल 2010 ला टाईम्स ऑफ इंडियाने महेशच्या हवाल्याने लिहिलं होतं "माझा भाऊ शैलेश आणि बहीण देवयानी क्रिकेटपटू असल्याने क्रिकेटवरील माझे प्रेम स्वाभाविक होते. लहान असताना प्रत्येकाला फलंदाजी करायला आवडते, मी पण आचरेकर सरांकडून व्यावसायिक प्रशिक्षण घेत होतो".
4 / 11
त्याच मुलाखतीत महेशने सांगितले होते की त्याने चॅरिटी सामन्यात सचिनबरोबर शतकी भागीदारी केली होती आणि कपिल देव कडून त्याला कौतुकाची थाप मिळाली होती.
5 / 11
मी त्यावेळी क्रिकेट क्षेत्रात नवीन होतो आणि त्या सामन्यात माझ्या संघात मोठ मोठे खेळाडू होते. त्यामुळे माझी फलंदाजी येईल की नाही हे मला माहित नव्हते. म्हणून मी सचिनच्या कानात म्हटले की मला फलंदाजी करायचीय. मग अनिल आणि मी डावाची सुरुवात केली. अनिल लवकर आऊट झाला. मग त्यानंतर सचिन आला. आम्ही दोघांनी 134 धावांची भागीदारी केली. त्या सामन्यात मी 52 धावा केल्या.
6 / 11
याच खेळीत मी कपिलदेवसारख्या खेळाडूविरुद्ध मोठे शॉट्स खेळले. कपिल सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आला आणि त्याने माझी तारीफ केली.
7 / 11
28 डिसेंबर 2018 रोजी, द वीकमध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसर्या मुलाखतीत महेशने क्रिकेट सोडण्यामागील सांगितलं होतं. त्याने ही मुलाखत आपली वेबसिरीज 'सिलेक्शन डे' च्या निमित्ताने दिली होती, ज्यात त्याने क्रिकेटमधील प्रशिक्षकाची टॉमीची भूमिका साकारली होती.
8 / 11
या मुलाखतीत महेश म्हणाला होता, "आचरेकर सरांची शैली वेगळी होती. आचरेकर सर काही ऐकून घेत नसत. तुम्ही त्यांच्याशी वाद घालू शकत नव्हता. काय बरोबर आहे, हे त्यांना नेहमी कळायचं... मला त्यांनी बॅटिंग करायला कधीच संधी दिली नाही. त्यांना वाटायचं मी बोलिंग करावी. मी क्रिकेट खेळणे सोडून दिले कारण मला फलंदाज व्हायचे होते. पण आचरेकर सर मला गोलंदाजी करायला सांगायचे."
9 / 11
क्रिकेट सोडल्यानंतर बर्याच वर्षांनी तो चित्रपट दुनियेत आला. तो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक झाला. त्याने बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं.
10 / 11
महेशने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मराठी चित्रपटातही काम केले आहे. 1988 मध्ये त्याने तेरे प्यार की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर त्यांने 1995 च्या आई या मराठी चित्रपटात दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट वास्तवचे (1999) दिग्दर्शनही महेश यांनी केलं.
11 / 11
दिग्दर्शक तसेच एक अभिनेता म्हणून महेश मांजरेकरांनी एकामागोमाग एक हिट सिनेमे दिले. आज कला क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे.