“जसप्रीत बुमराहला आता विसरून जा…”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

| Updated on: Mar 03, 2023 | 7:40 PM

जसप्रीत बुमराह गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेट मैदानात नाही. जसप्रीत बुमराहला नेमकं काय झालं आहे ? याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. आता माजी क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

जसप्रीत बुमराहला आता विसरून जा..., माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ
जसप्रीत बुमराह आता क्रिकेटमध्ये कधी परतणार? माजी क्रिकेटपटूच्या 'त्या' वक्तव्याने क्रीडाप्रेमींमध्ये चर्चेला उधाण
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : भारताच्या वेगवान गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघात नाही. आयसीसी वर्ल्ड टी 20 वर्ल्डकपमध्येही त्याला खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीतही त्याची उणीव भासत आहे. असं असताना जसप्रीत बुमराह कधी कमबॅक करणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जसप्रीत शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आता होणाऱ्या आयपीएल 2023 मध्येही तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता जसप्रीत बुमराहवर सर्जरी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळेल की नाही याबाबतही साशंकता आहे.

जसप्रीत बुमराह वर्ल्डकपआधी रिकव्हर झाला नाही तर पुनरागमनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सर्जरी झाल्यानंतर बुमराह एनसीए आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली असेल.असं असताना माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी बुमराह याच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. बुमराह या वर्षी खेळेल की नाही? याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी उमेश यादवचा विचार करावा असं मदन लाल यांनी सांगितलं आहे. उमेश यादव परफेक्ट सीमर असून इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत नक्कीच फायदा होईल. “मी उमेश यादवला अंतिम सामन्यासाठी पसंती देईल. तीन वेगवान गोलंदाज आणि एका स्पिनर संघात असेल. बुमराहला आता विसरा. त्याला सोडून द्या. बुमराह येईल तेव्हा बघू. त्याचा काही भरवसा नाही. त्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधीही लागू शकतो. त्याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळेच इतका आराम दिला आहे.”

“जास्तीत जास्त, दुखापतीतून बरं होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. बुमराह सप्टेंबरपासून खेळला नाही. हार्दिक पांड्या त्याच्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर 4 महिन्यांत संघात परतला. बुमराह तर 6 महिन्यांपासून खेळला नाही. मग तुम्ही तोच बुमराह परतेल अशी अपेक्षा कशी करु शकता. त्याला वेळ लागेल. जर तुम्हाला तोच बुमराह पाहायचा असेल तर तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल,” असे भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने पुढे सांगितलं.

बुमराहची क्रिकेट कारकिर्द

जसप्रीत बुमराह आतापर्यंत 30 कसोटी सामना खेळला आहे त्यात त्याने 128 गडी बाद केले आहेत.8 वेळा पाच गडी, तर 2 वेळा चार गडी बाद केले आहेत. 72 वनडे सामन्यात त्याने 121 गडी बाद केले आहेत. त्यात 2 वेळा पाच गडी आणि 5 वेळा चार गडी बाद केले आहेत. 60 टी 20 मध्ये एकूण 70 गडी बाद केले आहेत. आयपीएलमधील 210 सामन्यात 256 गडी टिपले आहेत.