मुंबई : टीम इंंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू पियूष चावलावर (Piyush Chawla) दुखाचा डोंगर कोसळला आहे. पीयूषचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे. स्वत: पियूषने इंस्टाग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तसंच मुंबई इंडियन्सने देखील ट्विट करुन पीयूषच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Cricketer Piyush Chawla Father Pramod Kumar Chawala Passed Away Due To Corona)
प्रमोद कुमार चावला (Pramod Kumar Chawla) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या काही दिवस त्यांचा कोरोनाविरोधी लढा सुरु होता. मात्र त्यांना कोरोनावर मात करण्यात अपयश आलं. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
पियूष चावला याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचं कोरोनाने निधन झालंय. आम्ही या कठीण प्रसंगी पियूष आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत, अशा भावना मुंबई इंडियन्सने ट्विट करुन व्यक्त केल्या आहेत.
Our thoughts go out to Piyush Chawla who lost his father, Mr. Pramod Kumar Chawla this morning.
We are with you and your family in this difficult time. Stay strong. pic.twitter.com/81BJBfkzyv
— Mumbai Indians (@mipaltan) May 10, 2021
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सने पियूषला 2 कोटी 40 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. स्पर्धा रद्द होण्यापर्यंत मुंबईने 7 सामने खेळले. पण त्यात पियूषला संधी मिळाली नाही. याआधी पियूषने कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केलं आहे.
कोलकाताने 2014 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. पियूष या संघाचा सदस्य होता. दरम्यान 2019 मध्ये कोलकाताने त्याला करारमुक्त केलं. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याला संधी दिली. पियूषसाठी सीएसकेने 6 कोटी 75 लाख मोजले.
दरम्यान, रविवारी 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंगाज चेतन साकरियाच्या वडीलांनाही कोरोनामुळे प्राण गमावावे लागले. साकरियाने आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम पणाला लावली. बाबांना वाचवण्यासाठी त्याने शक्य ते प्रयत्न केले. मात्र त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला.
चेतन साकरियाने आयपीएलमधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांना कोरोनाने हिरावून नेलंय.
(Cricketer Piyush Chawala Father Pramod Kumar Chawala Passed Away Due To Corona)
हे ही वाचा :
IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर