मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयुष्यात पहिल्यांदा स्वयंचलित मोडवर (Automatic driving mode) बीएमडब्ल्यू गाडी चालवण्याचा आनंद घेतला. याबाबतचा एक व्हिडीओही सचिनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ऑटो मोडवर गाडी चालवण्याचा अनुभव कसा होता याबाबतही त्याने सांगितले आहे.
सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटरवर शेअर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो स्वत:च्या बीएमडबल्यू गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला दिसत आहे. त्या गाडीच्या ड्रायव्हींग सीटवर कोणीही बसलेलं नसताना त्याची गाडी आपोआप सुरु होते. त्यानंतर ती गाडी आपोआप पार्किंग परिसरात पार्क होते.
Thrilling experience to witness my car park itself in my garage. It felt like Mr. India (@AnilKapoor) had taken control! ?
I’m sure the rest of the weekend will be as exciting with my friends. pic.twitter.com/pzZ6oRmIAt— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 2, 2019
कोणी अदृश्य व्यक्ती ही गाडी चालवत असल्याचा भास हा व्हिडीओ बघताना होतो. विशेष म्हणजे गाडी ऑटोमोडवर टाकल्यावर ती स्वत: चालू होते. तसेच गाडी थांबवण्यासाठी तिचा ब्रेकही आपोआप लागतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
#This Car ? price?
— ThangaPandian (@pandianfashion) August 2, 2019
माझी गाडी सुरु झाली असून त्यात कोणीही ड्रायव्हर नाही. पण मला खात्री आहे की, मिस्टर इंडिया म्हणजेच अनिल कपूर हे आधीच माझ्या गाडीच्या ड्रायव्हींग सीटवर बसलेत. त्यामुळे अनिल कपूर यांनी माझ्या गाडीला त्यांनी पूर्णपणे नियंत्रित केले आहेत. पहिल्यांदा ऑटो मोडवर गाडी चालवण्याचा माझा अनुभव रोमांचित होता, असे त्याने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
@MumbaiPolice : No seatbelt. Please fine the God. ?
— Dr. Vishal ?? (@vsurywanshi87) August 2, 2019
सचिनला अशाप्रकारे ऑटो मोडवर गाडी चालवण्याचा अनुभव घेत असताना बघून त्याच्या चाहतेही चांगलेच खुश झाले. काही चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओखाली मजेशीर कमेंटही केल्यात. विशेष म्हणजे ट्विटरच्या एका युझर्सने मुंबई पोलिसांना टॅग करत “सीट बेल्ट लावलेला नाही. कृपया दंड लावू नये” असे लिहिले आहे. तर काहींनी या गाडीची किंमत विचारली आहे. सचिन नवनवीन गाड्यांचा चांगला शौकीन आहे. त्याच्याकडे Maruti 800 पासून Nissan GT-R आणि फेरारी यासारख्या गाड्यांचा समावेश आहे.