मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याने 10 जून रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. क्रिकेटसोबत वैयक्तिक आयुष्यातही आजाराशी संघर्ष करुन, सर्व अडथळ्यांवर मात करुन, प्रेरणेचं दुसरं नाव बनलेला युवराज सिंहने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आपली निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता युवराज आता एका नोकरीच्या शोधत आहे. यासाठी त्याने एका कंपनीत मुलाखतही दिली असून याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेल्या युवराज एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जातो. त्या कंपनीचा बॉस हा चड्डा नावाचा एक व्यक्ती असतो. तिथे गेल्यानंतर त्याचा बॉस त्याला अनेक प्रश्न विचारतो. तू आतापर्यंत काय काय विकले आहेस असा प्रश्न बॉस त्याला विचारतो. त्यावर युवराज हो, मला गाडी, चॉकलेट, टूथपेस्ट, फ्रिज यासह इन्सुअरन्स विकण्याचा अनुभव आहे असे सांगतो.
त्यानंतर युवराज तुम्हाला हवे तर, मी पेपर पण विकू शकतो. त्यानंतर त्याचा बॉस चड्डा एका पेपरवर त्याचा ऑटोग्राफ करुन घेतो. त्यानंतर तो युवराजचा थ्रो टेस्टही घेतो. तसेच त्याला क्रिकेटला हिंदीत काय म्हणतात असा प्रश्नही बॉस विचारतो. त्यावेळी तो लंब-दंड-गोल पिंड-भाग-दौड प्रतियोगिता असे उत्तर देतो. युवराजच्या या उत्तरानंतर त्याचा बॉस त्याला सॅलरीबद्दल विचारतो. तेव्हा बॉसच्या बोलण्यानं युवराज चिडून मुलाखतीतून उठून जातो.
हा व्हायरल होत असलेला संपूर्ण व्हिडीओ एका वेबसीरिजमधला आहे. ‘द ऑफिस इंडिया’ असे या सीरिजचे नाव असून यात युवराजने नोकरी शोधणाऱ्या मुलाखतदाराची भूमिका साकारली आहे. हॉट स्टार (Hotstar) यावर ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे.
भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता. युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.
Yuvi Retires. Chaddha Hires. Will he take up the Wilkins Chawla Challenge? #TheOfficeIndia@YUVSTRONG12 @mukulchadda @thegopaldatt pic.twitter.com/DzJQ6pNJzG
— Hotstar Specials (@HotstarSpecials) June 29, 2019
संबंधित बातम्या
नाव – युवराज सिंह, वय 37 वर्ष, 6 चेंडूत 6 सिक्स, युवीची संपूर्ण कारकीर्द
कॅन्सरने डगमगला नाही, मात्र निवृत्ती जाहीर करताना युवराज सिंह ढसाढसा रडला!