CSK vs RR IPL 2021 Match 12 Result : राजस्थानवर 45 धावांनी मात करत चेन्नईची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप

| Updated on: Apr 20, 2021 | 6:27 AM

आयपीएल 2021 स्पर्धेत सोमवारी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

CSK vs RR IPL 2021 Match 12 Result : राजस्थानवर 45 धावांनी मात करत चेन्नईची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप
CSK vs RR
Follow us on

मुंबई : आयपीएल 2021 स्पर्धेत आज (सोमवार) महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना खेलवण्यात आला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या डावात फलंदाजी करत चेन्नईने राजस्थानसमोर 188 धावांचा डोंगर उभा केला होता. चेन्नईने दिलेलं 189 धावांचं आव्हान राजस्थानच्या फलंदाजांना पेलवलं नाही. राजस्थानच्या फलंदाजांना 9 विकेट्सच्या बदल्यात केवळ 143 धावाच करता आल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने 49 धावांची खेळी करत चांगला प्रतिकार केला. बटलरव्यतिरिक्त राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. चेन्नईकडून या सामन्यात मोईन अलीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रवींद्र जाडेजा आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक विकेट मिळवली. (Live Scorecard)

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 Apr 2021 11:13 PM (IST)

    राजस्थानचा आठवा फलंदाज माघारी, राहुल तेवतिया 20 धावांवर बाद

    राजस्थानचा आठवा फलंदाज माघारी परतला आहे. राहुल तेवतियाने ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडकडे सोपा झेल दिला. तेवतियाने 20 धावांचं योगदान दिलं. (राजस्थान 137/8)

     

  • 19 Apr 2021 10:52 PM (IST)

    राजस्थानला सातवा झटका, ख्रिस मॉरिस शून्यावर बाद

    राजस्थानला सातवा झटका, ख्रिस मॉरिस एकही भोपळ्यावर बाद झाल आहे. मोईन अलीच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाने सोपा झेल घेत मॉरिसला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (राजस्थान 95/7)


  • 19 Apr 2021 10:50 PM (IST)

    राजस्थानचा सहावा फलंदाज माघारी, रियान पराग 3 धावांवर बाद

    राजस्थानचा सहावा फलंदाज माघारी परतला आहे. रियान पराग 3 धावांवर बाद झाल आहे. मोईन अलीच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाने सोपा झेल घेत परागला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (राजस्थान 95/6)

  • 19 Apr 2021 10:44 PM (IST)

    राजस्थानचा पाचवा फलंदाज माघारी, डेव्हिड मिलर 2 धावांवर बाद

    राजस्थानचा पाचवा फलंदाज माघारी परतला आहे, 13 व्या मोईन अलीने डेव्हिड मिलरला पायचित (LBW) केलं. मिलरने केवळ 2 धावांचं योगदान दिलं. (राजस्थान 92/5)

  • 19 Apr 2021 10:40 PM (IST)

    राजस्थानचा चौथा झटका, शिवम दुबे 17 धावांवर बाद

    राजस्थानचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे. रवींद्र जाडेजाने शिवम दुबेला पायचित (LBW) केलं. दुबेने 17 धावा केल्या. (राजस्थान 90/4)

  • 19 Apr 2021 10:35 PM (IST)

    राजस्थानचा तिसरा फलंदाज माघारी, जॉस बटलर 49 धावांवर बाद

    राजस्थानचा तिसरा फलंदाज माघारी परतला आहे. रवींद्र जाडेजाने जॉस बटलर 49 धावांवर त्रिफळाचित केलं. (राजस्थान 87/3)

  • 19 Apr 2021 10:26 PM (IST)

    जॉस बटलरकडून फटकेबाजी

    10 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर जॉस बटलरने शानदार षटकार फटकावला.

  • 19 Apr 2021 10:07 PM (IST)

    राजस्थानला दुसरा झटका, कर्णधार संजू सॅमसन बाद

    राजस्थान रॉयल्सने दुसरी विकेट गमावली आहे. सॅम करनच्या गोलंदाजीवर ड्वेन ब्राव्होच्या हाती झेल देत कर्णधार संजू सॅमसन माघारी परतला.

  • 19 Apr 2021 09:56 PM (IST)

    राजस्थानला पहिला झटका, मनन वोहरा बाद

    राजस्थानला पहिला झटका, सलामीवीर मनन वोहरा बाद, त्याने 11 चेंडून 14 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. सॅम करनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. रविंद्र जडेजाने त्याचा अचूक झेल टीपला.

  • 19 Apr 2021 09:44 PM (IST)

    राजस्थानचे पहिल्या षटकात 11 धावा, दोघी सलामीवीरांकडून प्रत्येकी एक चौकार

    राजस्थानचे पहिल्या षटकात 11 धावा, दीपक चहरच्या पहिल्याच बोलवर जोस बटलरने चौकार लगावत सामन्याची सरुवात केली. तर वोहरानेही एक चौकार लगावला.

  • 19 Apr 2021 09:41 PM (IST)

    जोस बटलरकडून चौकार मारुन शानदार सुरुवात

    राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने पहिल्याच चेंडूत चौकार मारुन डावाला सुरुवात केली. चेन्नईकडून दीपक चहर हा पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 19 Apr 2021 09:38 PM (IST)

    राजस्थानच्या डावाला सुरुवात, चेन्नईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानासाठी सज्ज

    राजस्थानच्या डावाला सुरुवात, चेन्नईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानासाठी सज्ज, मनन वोहरा आणि जोस बटलर फलंदाजीसाठी मैदानात

  • 19 Apr 2021 09:23 PM (IST)

    चेन्नईचा 9 वा फलंदाज बाद, 1 धाव करुन शार्दुल ठाकूर बाद

    चेन्नईचा 9 वा फलंदाज बाद झाला आहे. संजू सॅमसनने शार्दुल ठाकूरला धावबाद केलं.

  • 19 Apr 2021 09:17 PM (IST)

    चेन्नईचा आठवा फलंदाज बाद, सॅम करन 12 धावांवर बाद

    चेन्नईचा आठवा फलंदाज बाद झाला आहे. मुस्तफीजूर रहमानने सॅम करनला 12 धावांवर धावबाद केलं.

  • 19 Apr 2021 09:12 PM (IST)

    चेन्नईचा सातवा फलंदाज बाद, रवींद्र जाडेजा 8 धावांवर बाद

    चेन्नईचा सातवा फलंदाज बाद झाला आहे. रवींद्र जाडेजा 8 धावांवर बाद, ख्रिस मॉरिसचं दुसरं यश (चेन्नई 163/7)

  • 19 Apr 2021 09:05 PM (IST)

    चेन्नईचा सहावा फलंदाज माघारी, महेंद्रसिंह धोनी 18 धावांवर बाद

    चेन्नईचा सहावा फलंदाज माघारी परतला आहे. चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी जोस बटलरच्या हाती झेल देत बाद झाला आहे. त्याने 17 चेंडूत 18 धावा केल्या. (चेन्नई 147/6)

  • 19 Apr 2021 09:00 PM (IST)

    धोनीचा पहिला चौकार

    17 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर महेंद्रसिह धोनीने आजच्या सामन्यातील पहिला चौकार फटकावला.

  • 19 Apr 2021 08:45 PM (IST)

    चेन्नईचा पाचवा फलंदाज माघारी, सुरेश रैना 18 धावांवर बाद

    चेन्नईचा पाचवा फलंदाज माघारी परतला आहे. चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर सुरेश रैना ख्रिस मॉरिसच्या हाती झेल देत बाद झाला. (चेन्नई 125/5)

     

  • 19 Apr 2021 08:41 PM (IST)

    चेन्नईचा चौथा फलंदाज माघारी, अंबाती रायुडू 27 धावांवर बाद

    चेन्नईचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे. चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडू 27 धावांवर बाद झाला. सीमारेषेजवळ रियान परागने अप्रतिम झेल टिपत रायुडूला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (चेन्नई 123/4)

  • 19 Apr 2021 08:31 PM (IST)

    अंबाती रायुडूचा आणखी दोन षटकार

    12 व्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने सलग दोन षटकार लगावले. ( चेन्नई 112/3)

  • 19 Apr 2021 08:28 PM (IST)

    रैनाचा पहिला षटकार

    11 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रियान परागच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने शानदार षटकार फटकावला. (चेन्नई 38/3)

  • 19 Apr 2021 08:25 PM (IST)

    अंबाती रायुडूचा षटकार

    11 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर रियान परागच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने षटकार फटकावला.

  • 19 Apr 2021 08:21 PM (IST)

    चेन्नईचा तिसरा फलंदाज माघारी, मोईन अली 26 धावांवर बाद

    चेन्नईचा तिसरा फलंदाज माघारी परतला आहे. फिरकीपटू राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर मोईन अली रियान परागच्या हाती झेल देत बाद झाला. (चेन्नई 78/3)

  • 19 Apr 2021 08:13 PM (IST)

    मोईन अलीची फटकेबाजी

    दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर मोईन अलीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. त्याने आधी मुस्तफिजुर रहमान आणि नंतर ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत दोन षटकार फटकावले. (8 षटकात चेन्नईच्या 2 बाद 66 धावा)

  • 19 Apr 2021 08:11 PM (IST)

    चेन्नईला दुसरा झटका, सलामीवीर फॅफ डुप्लेसी 33 धावांवर बाद

    चेन्नईचा दुसरा सलामीवीर माघारी परतला आहे. ख्रिस मॉरिसने फॅफ डुप्लेसीला सीमारेषेजवळ रियान परागच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. डुप्लेसीने 17 चेंडूत 33 धावा फटकावल्या.

  • 19 Apr 2021 07:56 PM (IST)

    फॅफ डुप्लेसीची फटकेबाजी, 5 व्या षटकात 19 धावा वसूल

    चेन्नईचा सलामीवीर फॅफ डुप्लेसीने पाचव्या षटकात जयदेव उनादकडच्या गोलंदाजीवर तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 19 धावा फटकावल्या.

  • 19 Apr 2021 07:50 PM (IST)

    चेन्नईला पहिला झटका, सलामीवीर ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद

    चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. मुस्तफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर सलामीवीर ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद.

  • 19 Apr 2021 07:43 PM (IST)

    तीन षटकात चेन्नईच्या 22 धावा

    फॅफ डुप्लेसीने दुसऱ्या षटकात फटकावलेला षटकार आणि तिसऱ्या षटकातील चौकारासाह चेन्नईच्या सलामीवीरांनी 3 षटकांमध्ये 22 धावा जमवल्या आहेत.

  • 19 Apr 2021 07:03 PM (IST)

    नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

    नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 19 Apr 2021 06:36 PM (IST)

    चेन्नईच्या गोलंदाजांचं वर्चस्व

    गोलंदाजीतही चेन्नईचा संघ उजवा वाटतो, कारण उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स रवींद्र जाडेजा आण ड्वेन ब्राव्होने मिळवल्या आहेत. प्रत्येकी 15 विकेट्स दोघांच्या नावावर आहेत.

  • 19 Apr 2021 06:36 PM (IST)

    रेनाच्या सर्वाधिक धावा

    उभय संघांमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सुरेश रैनाने सर्वाधिक 638 धावा केल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर राजस्थानचा माजी शिलेदार अजिंक्य रहाणे आहे. रहाणे यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. तेव्हा त्याने राजस्थानकडून खेळताना चेन्नईविरुद्ध 335 धावा फटकावल्या होत्या.

  • 19 Apr 2021 06:36 PM (IST)

    चेन्नईचं पारडं जड

    आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. या 24 पैकी 14 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर राजस्थानने 9 सामने जिंकले आहेत.