मुंबई : डेव्हिड वॉर्नर (david warner), ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन. आपल्या बॅटिंगने त्याने जागतिक क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. भरवशाचा आणि सातत्याने धावा करणारा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुऱ्या हाताने मैदानाच्या चारही कोपऱ्यात फटके खेळण्यात तो माहिर आहे. ओपनिंगला येऊन सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघावर हल्ला करण्यात आणि धावा जमवण्यासाठी त्याला ओळखलं जातो. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाकडून खेळतो तसंच त्याच्या खांद्यावर हैदराबाद संघाची धुरा देखील आहे. अतिशय यशस्वीपणे तो हैदराबादची धुरा सांभाळतोय. त्याच्या क्रिकेट करिअरवर आपण नजर टाकूया… (David warner IPL 2021 SH Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Australian Cricket Players Latest News in Marathi)
कसोटी पदार्पण- डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर 2011 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
वनडे पदार्पण – डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2009 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
टी ट्वे्न्टी पदार्पण- डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2009 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
फॉरमॅट मॅच इनिंग रन्स सर्वाधिक रन्स स्ट्राईक रेट
कसोटी 86 159 7311 335* 72.68
वन डे 128 126 5455 179 95.53
टी ट्वेन्टी 81 81 2265 100* 139.72
IPL 142 142 5254 126 141.54
डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत 86 मॅचेसमध्ये 72.68 च्या स्ट्राईक रेटने 7 हजार 311 रन्स केले आहेत. त्यातील 335 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 128 मॅचेसमध्ये 95.53 च्या सरासरीने 5 हजार 455 रन्स केले आहेत. त्यातील 179 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 81 मॅच खेळल्या आहेत. त्यात 139.72 च्या स्ट्राईट रेटने त्याने 2 हजार 265 धावा फटकावल्या आहेत. त्यात नाबाद 100 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 142 सामन्यांत 141.54 च्या स्ट्राईक रेटने 5हजार 254 रन्स केले आहेत. त्यात 126 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हैदराबादला आतापर्यंत एकदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. हैदराबादने 2016 मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. हैदराबादने गेल्या मोसमात टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. मात्र क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. हैदराबादने गेल्या मोसमात एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या मोसमात गत मोसमापेक्षा आणखी दमदार कामगिरी करण्याचा मानस हैदराबादचा असणार आहे.
डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, रिद्धिमान साहा, बासिल थंपी, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, विराट सिंह, टी. नटराजन, अब्दुल समद, केन विलियमसन, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, मिचेल मार्श, सिद्धार्थ कौल, प्रियम गर्ग, श्रीवत्स गोस्वामी, केदार जाधव, मुजीब उर रेहमान आणि जगदीश सुचिथ
आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम