मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) फिल्म यायची बाकी आहे त्याच्याअगोदरच ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आयपीएलचा पिक्चर कसा असेल, याचा ट्रेलर दाखवला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जो गोलंदाज समोर येईल त्याच्यावर वॉर्नरने आक्रमण केलं. 2 मॅचमध्ये त्याने 24 खणखणीत चौकार लगावले तर एक धडाकेबाज शतकही साजरं केलं. त्यामुळे अगदी काही दिवसांपासून येऊन ठेपलेल्या आयपीएल सामन्यांत वॉर्नरची बॅट तळपणार, याची खात्री क्रिकेट चाहत्यांना आहे. (David warner terrific Form 2 Match 24 boundries And 1 Hundred Ahead IPL 2021)
ऑस्ट्रेलियातील वनडे टूर्नामेंटच्या मार्श कपमध्ये तस्मानियाविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने धमाकेदार खेळी केली. या सामन्यात रन्सचा पाठलाग करताना वॉर्नरने टीम न्यू साऊथ वेल्ससाठी धडाकेबाज शतक ठोकलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना तस्मानियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 258 रन्स केले. प्रत्युत्तरादाखल वॉर्नरने बहारदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 7 चेंडू शिल्लक असताना गडी विकेट्सने टीम न्यू साऊथ वेल्सने विजय नोंदवला.
डावखुऱ्या डेव्हिड वॉर्नरने या मॅचमध्ये 115 बॉलमध्ये 10 चौकारांच्या साथीने 108 रन्स केले. या खेळीदरम्यान दुसऱ्या विकेट्ससाठी त्याने मोजेज हेनरिक्सच्या साथीने शतकी भागीदारी केली.
याअगोदर वॉर्नरने 4 मार्च रोजी साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दुखापतीतून सावरत दमदार अर्धशतक ठोकलं. त्यावेळेही रन्सचा पाठलाग करताना 74 बॉलमध्ये त्याने 87 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला.
वॉर्नरने 2 मॅचमध्ये 24 खणखणीत चौकार लगावले तर एक धडाकेबाज शतकही साजरं केलं. वॉर्नरने पहिल्या सामन्यात दमदार 87 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 108 धावा काढल्या. एकंदरित दोन सामन्यात त्याने 195 धावा ठोकल्या. म्हणजे 97.5 च्या सरासरीने त्याने दोन्ही सामन्यात खेळी केल्या.
(David warner terrific Form 2 Match 24 boundries And 1 Hundred Ahead IPL 2021)
हे ही वाचा :
इरफान पठाणकडून आतापर्यंतची सगळ्यात खराब ओव्हर, ‘सचिन पाजी’च्या मार्गदर्शनाने जोरदार कमबॅक!
मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, फलंदाजांची धमाल, केवळ 4 चेंडूत वन डे मॅच जिंकली, नेमकं काय घडलं?
Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!