DC vs KKR IPL 2021 Match 25 Result | पृथ्वी शॉचा झंझावात, दिल्ली कॅपिट्लसची कोलकात्यावर 7 विकेट्सने मात

| Updated on: Apr 29, 2021 | 10:59 PM

DC vs KKR 2021 Live Score In Marathi | दिल्लीने कोलकाताला पराभूत करत पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

DC vs KKR IPL 2021 Match 25 Result | पृथ्वी शॉचा झंझावात, दिल्ली कॅपिट्लसची कोलकात्यावर 7 विकेट्सने मात
DC vs KKR 2021 Live Score In Marathi | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स लाईव्ह आमनेसामने
Follow us on

अहमदाबाद | दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 16.3 ओव्हरमध्ये 7 विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. पृथ्वीने 41 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तब्बल 200.00 च्या स्ट्राईक रेटने दमदार 82 धावांची खेळी केली. तर शिखर धवनने 46 धावांची खेळी केली.

Key Events

पृथ्वीची धमाकेदार खेळी

दिल्लीचा युवा सलामवीर पृथ्वी शॉ दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. पृथ्वीने 41 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसत तब्बल 200.00 च्या स्ट्राईक रेटने दमदार 82 धावांची खेळी केली. तर शिखर धवनने 46 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पृथ्वीने या मोसमातील 18 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. तसेच त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये शिवम मावीच्या गोलंदाजीवर 6 चौकार लगावले.

दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीने कोलकाताला पराभूत करत पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्याआधी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर होती. दिल्लीने या मोसमातील 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Apr 2021 10:54 PM (IST)

    दिल्लीचा दमदार विजय

    दिल्लीने कोलकातावर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. कोलकाताने दिलेले 155 धावांचे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पृथ्वी शॉने दिल्लीकडून सर्वाधिक 82 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 10:37 PM (IST)

    ऋषभ पंतचा षटकार

    15 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावला. (दिल्ली – 146/2)


  • 29 Apr 2021 10:32 PM (IST)

    दिल्लीला पहिला झटका, शिखर धवन 46 धावांवर बाद

    दिल्लीने पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर शिखर धवन 46 धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पायचित झाला. (दिल्ली 132/1)

  • 29 Apr 2021 10:23 PM (IST)

    जळगावमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या 14 जणांना अटक

    जळगाव – जामनेर येथे आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या 14 जणांना अटक

    जामनेर पोलिसांची धडक कारवाई

    या कारवाईत 63 हजार 330 रुपये, 6 लाख किंमतीचा ऐवज जप्त

  • 29 Apr 2021 10:22 PM (IST)

    पृथ्वी शॉचा तिसरा षटकार

    13 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सुनील नारायणच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने जोरदार षटकार लगावला. (दिल्ली 121/0)

  • 29 Apr 2021 10:14 PM (IST)

    10.2 षटकात दिल्लीचं शतक, शॉ-धवनची फटकेबाजी

    सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने 10.2 षटकांमध्ये धावफलकावर 100 धावा झळकावल्या आहेत.

  • 29 Apr 2021 10:03 PM (IST)

    पृथ्वी शॉची झंझावाती खेळी, 18 चेंडूत अर्धशतक

    पृथ्वी शॉने 18 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावलं आहे. यासह पृथ्वी या मोसमात वेगवान अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला आहे.

  • 29 Apr 2021 09:47 PM (IST)

    शिखर-पृथ्वी सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी 

    दिल्लीची शानदार सुरुवात झाली आहे. शिखर धवन-पृथ्वी शॉ सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 29 Apr 2021 09:30 PM (IST)

    पृथ्वीचे 6 चेंडूत 6 फोर

    पृथ्वी शॉने पहिल्याच ओव्हर मध्ये शिवम मावीच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 चौकार ठोकले आहेत.

  • 29 Apr 2021 09:24 PM (IST)

    दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात

    दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. शिखर-पृथ्वी सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी 155 धावांची  आवश्यकता आहे. 
     
     
  • 29 Apr 2021 09:17 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान

    कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. बर्थडे बॉय आंद्रे रसलेने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर शुबमन गिलने 43 रन्सची खेळी केली.

     

  • 29 Apr 2021 08:53 PM (IST)

    कोलकाताला सहावा धक्का

    कोलकाताने सहावी विकेट गमावली आहे. स्विच हिट मारण्याच्या नादात दिनेश कार्तिक एलबीडब्ल्यू आऊट  झाला आहे. कार्तिकने 14 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 08:51 PM (IST)

    आंद्रे रसेलच्या 6 हजार धावा

    आंद्रे रसेलने टी 20 क्रिकेटमध्ये एक किर्तीमान स्थापित केला आहे. रसेलने टी 20 क्रिकेटमध्ये  6 हजार धावांचा टप्पा पूर्ण  केला आहे.

     

  • 29 Apr 2021 08:46 PM (IST)

    आंद्रे रसेलचा सिक्स

    कोलकाताचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलने 16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर जोरदार सिक्स लगावला.

  • 29 Apr 2021 08:45 PM (IST)

    दिनेशचा कार्तिकचा शॉर्ट सिक्स

    दिनेश कार्तिकने 15 व्या ओव्हरच्या 6 व्या चेंडूवर अक्षर पटेलच्या बोलिंगवर 73 मीटर लांबीचा सिक्स लगावला.  यासह कोलकाताचा 15 ओव्हनंतर  95-5 स्कोअर झाला आहे.

  • 29 Apr 2021 08:34 PM (IST)

    कोलकाताला पाचवा धक्का

    कोलकाताने पाचवी विकेट गमावली आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आऊट झाला आहे. गिलने 43 धावांची खेळी केली.

  • 29 Apr 2021 08:26 PM (IST)

    कोलकाताला 11 व्या ओव्हरमध्ये 2 झटके

    फिरकीपटू ललित यादवने सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये कोलकाताला 2 झटके दिले आहेत. ललितने आधी कर्णधार इयोन मॉर्गनला स्टीव्ह स्मिथच्या हाती कॅच आऊट केलं. तर त्यानंतर सुनील नारायणचा त्रिफळा उडवला. विशेष म्हणजे या दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

  • 29 Apr 2021 08:21 PM (IST)

    कोलकाताला मोठा धक्का

    कोलकाताला मोठा धक्का बसला आहे.  कर्णधार इयोन मॉर्गन भोपळा न फोडता माघारी परतला आहे. मॉर्गनने सामन्यातील 11 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर ललित यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या स्टीव्ह स्मिथने शानदार कॅच घेतला. मॉर्गन दुसऱ्या चेंडूवर शून्यावर कॅच आऊट झाला.

  • 29 Apr 2021 08:16 PM (IST)

    कोलकाताला दुसरा झटका

    कोलकाताला दुसरा झटका लागला आहे. राहुल त्रिपाठी आऊट झाला आहे. त्रिपाठीने  19 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 08:05 PM (IST)

    कोलकाताचा पावर प्लेनंतर स्कोअर

    कोलकाताने पावर प्लेमधील 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 45 धावा केल्या आहेत. मैदानात राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल खेळत आहेत. कोलकाताने नितीश राणाच्या रुपात एकमेव विकेट गमावली.

  • 29 Apr 2021 07:55 PM (IST)

    कोलकाताचा 5 ओव्हरनंतर स्कोअर

    कोलकाताने 5 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 32 धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी मैदानात खेळत आहेत.

  • 29 Apr 2021 07:50 PM (IST)

    कोलकाताला पहिला धक्का

    कोलकाताला पहिला झटका लागला आहे.  नितीश राणा मोठा फटका मारण्याच्या नादात क्रीझ बाहेर आला. त्यामुळे विकेटकीपर रिषभ पंतने नितीशला यष्टीचित केलं. नितीशने 15 धावा केल्या.

  • 29 Apr 2021 07:31 PM (IST)

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. नितीश राणा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 29 Apr 2021 07:29 PM (IST)

    कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन

    ऑयन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नारायण, आंद्रे रसल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.

  • 29 Apr 2021 07:28 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार

    रिषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, इशांत शर्मा, ललित यादव, कगिसो रबाडा आणि आवेश खान.

  • 29 Apr 2021 07:11 PM (IST)

    दिल्ली कॅपिट्ल्सचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

    दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 29 Apr 2021 06:46 PM (IST)

    दिल्ली विरुद्ध कोलकाता आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 25 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामन्याला अवघ्या काही मिनिटांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.