मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला. तसेच सलग तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकत हॅटट्रिक साधली. या स्पर्धेत भारताचं स्वप्न उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या पाच धावांनी पराभव सहन करावा लागला. या स्पर्धेत भारतीय महिला संघ भले पराभूत झाली असेल मात्र उपांत्य फेरीत पोहोचण्याच नक्कीच फायदा झाला आहे. 2024 मध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला थेट एंट्री मिळाली आहे. वर्ल्डकप 2023 ग्रुपमध्ये टॉप सहा संघांना वर्ल्डकपचं थेट तिकीट मिळत.
भारतीय महिला संघानं ब गटात टॉप तीनमध्ये स्थान मिळवलं आहे. दोन्ही गटातील सहा संघांसोबपत बांगलादेश आणि पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने स्थान निश्चित झालं आहे. वर्ल्डकपच्या गट अ मधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेला स्थान मिळालं आहे. तर गट ब मधून भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचं स्थान निश्चित झालं आहे.
2023 वर्ल्डकपमधील श्रीलंका आणि आयर्लंड संघ क्वालिफाय करू शकला नाही. त्यामुळे आठ निश्चित झाल्यानंतर उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरीचं आयोजन केलं जाईल. पात्रता फेरीत पात्र झालेल्या दोन संघांना टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये स्थान मिळणार आहे.
वर्ल्डकप 2023 मधील भारतीयच संघाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास
- साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात 149 धावा करून 150 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं. हे आव्हान भारतीय महिला संघानं 19 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं.
- दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारतानं 4 गडी गमवून 18.1 षटकात पूर्ण केलं.
- तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारताला पराभवाचं पाणी चारलं. इंग्लंडनं 20 षटकात 7 गडी गमवून 151 धावांचं आव्हान दिलं. भारताला 20 षटका 5 गडी 140 धावाच करता आल्या. भारताचा 11 धावांनी पराभव झाला.
- चौथ्या सामन्यात भारताने आयर्लंडला विजयासाठी 6 गडी गमवून 156 धावांचं आव्हान दिलं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडला 8.2 षटकात 2 गडी गमवून 54 धावा करता आल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा 5 धावांनी विजय झाला.
- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावाच करु शकला.