RCB vs RR : देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक, ठरला तिसरा युवा फलंदाज

| Updated on: Apr 22, 2021 | 11:37 PM

IPL मध्ये आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव केला.

RCB vs RR : देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक, ठरला तिसरा युवा फलंदाज
Devdutt Padikkal
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 16 वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे दोन संघ भिडले. या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळुरुने संजू सॅसमनच्या राजस्थान रॉयल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. (Devdutt Padikkal became 3rd youngest to hit century in IPL, RCB vs RR)

राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 षटकांमध्ये पूर्ण केलं. बंगळुरुचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहली या विजयाचे शिल्पकार ठरले. पडिक्कलने आजच्या सामन्यात 101 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. बंगळुरुचा या मोसमातील हा सलग चौथा विजय ठरला.

देवदत्त पडीक्कलने आजच्या सामन्यात 52 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याचबरोबर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक करणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे. 20 वर्ष 289 दिवस इतकं वय असलेल्या देवदत्तने आज त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक फटकावलं आहे. त्याच्या आधी दोन फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

मनीष पांडे पहिल्या नंबरवर, पंत दुसऱ्या स्थानी

मनीष पांडे हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या दुसऱ्याच मोसमात (IPL 2009) पांडेने शतक ठोकलं होतं. तेव्हा त्याचं वय केवळ 19 वर्ष 253 दिवस इतकं होतं. ऋषभ पंत हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा युवा फलंदाज आहे. त्याने आयपीएल 2018 मध्ये शतक फटकावलं होतं. तेव्हा त्याचं वय केवळ 20 वर्ष 218 दिवस इतकं होतं. या पंक्तीत आता देवदत्त पडीक्कलनेदेखील स्थान मिळवलं आहे.

पडीक्कलची आतापर्यंतची IPL मधील कामगिरी

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.

विजय हजारे करंडक स्पर्धेतील कामगिरी

देवदत्तने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.

फॉरमॅट
सामने
डाव
नाबाद
धावा
हायस्कोर
सरासरी
BF
CT
SR
100s
50s
Firts Class
15
29
3
907
99
34.88
1794
6
50.55
0
10
List A
20
20
4
1387
152
86.68
1597
32
86.5
6
9
T-20
33
33
4
1271
122
43.82
871
50
145.92
1
11

संबंधित बातम्या

VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ

RCB vs RR, IPL 2021 Match 16 Result | देवदत्त पडीक्कलचे शतक, विराटची शानदार खेळी, बंगळुरुचा विजयी ‘चौकार’, राजस्थानवर 10 विकेट्सने मात

IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला

(Devdutt Padikkal became 3rd youngest to hit century in IPL, RCB vs RR)