अबुधाबी : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने प्ले ऑफमध्ये धडक मारली. तसेच पराभवानंतरही बंगळुरुनेही प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) धडक मारली. या सामन्यात बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) अर्धशतकी कामगिरी केली. या कामगिरीसह देवदत्तने विक्रमी कामगिरी केली. Devdutt Padikkal became the highest run scorer in his IPL debut
Most 50+ scores in debut season by uncapped Indian players
5 Devdutt Padikkal in 2020 (RCB)
4 Shikhar Dhawan in 2008 (DD)
4 Shreyas Iyer in 2015 (DD)But Paddikal's OUT now, for a 41-ball 50#RCB – 112 for 3https://t.co/KVUiJ32bKa#DCvRCB #IPL2020
— Cricbuzz (@cricbuzz) November 2, 2020
पडीक्कलने 41 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. देवदत्तची ही या मोसमातील 5 वी अर्धशतकी खेळी ठरली. देवदत्तची ही पहिलीच आयपीएल स्पर्धा आहे. म्हणजेच आयपीएलच्या 13 व्या मोसमातून देवदत्तने पदार्पण केलं. देवदत्त पदार्पणातील मोसमात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड ब्रेक केला. देवदत्तने या मोसमातील 14 सामन्यात 472 धावा केल्या. श्रेयस अय्यर हा सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. श्रेयसने 2015 मध्ये दिल्लीकडून खेळताना 439 धावा केल्या होत्या. अनकॅप्ड म्हणजे देशांतर्गंत स्पर्धेत खेळणारा खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू.
देवदत्तने 5 व्या अर्धशतकासह गब्बर शिखर धवनचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला. शिखर धवन 2008 मध्ये दिल्लीकडून खेळत होता. त्यावेळेस शिखर अनकॅप्ड खेळाडू होता. तेव्हा धवनने 4 अर्धशतकं लगावली होती.
देवदत्तने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील एकूण सर्वच म्हणजेच 14 सामने खेळले. यामध्ये त्याने 126.54 च्या स्ट्राईक रेटने तसेच 33.71 च्या सरासरीने 472 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्तची 74 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
दिल्लीने बंगळुरुचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र या पराभवानंतरही बंगळुरुने प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. बंगळुरु प्ले ऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. बंगळुरुने नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे प्ले ऑफमधील 3 संघ ठरले आहे. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु अनुक्रमे पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
संबंधित बातम्या
IPL 2020 | दिनेश कार्तिकची विक्रमाला गवसणी, कॅप्टन कूल धोनीचा विक्रम मोडित
IPL 2020, DC vs RCB : अजिंक्य रहाणे-शिखर धवनची अर्धशतकी खेळी, दिल्लीची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात
Devdutt Padikkal became the highest run scorer in his IPL debut