मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने टीम इंडियाला दोन विश्वचषक (World Cup) जिंकून दिले आहेत. त्यामुळे धोनीला टीम इंडियाचा लकी कर्णधार असं म्हटलं जातं. धोनीने T20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे.
यंदा आयपीएलचा 16 वा सीजन होणार आहे. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळताना दिसेल. चेन्नई सुपर किंग्ज या टीमला सर्वोच्चस्थानी घेऊन जाण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत चैन्नई सुपर किंग्जने अनेकवेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. यंदाच्यावर्षी महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे.
विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर आणि निवड समितीवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयचं एक पद देण्याचा विचार केला आहे. महिना अखेरीस ज्यावेळी बैठक होईल त्यावेळी धोनीच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्यावर तिन्ही क्रिकेटची जबाबदारी असल्यामुळे अधिक लोड येत आहे. तिन्ही क्रिकेटच्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकाची गरज आहे. धोनीकडे T20 फॉरमॅटमधील जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
धोनीकडे चांगला अनुभव आहे, त्याचा फायदा बीसीसीआय करुन घेण्याचा विचार करीत आहे. कारण धोनी कर्णधार असताना टीम इंडियाने अनेक चषक जिंकले आहेत.