मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा (Team India) जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami)अधिक चर्चेत आहे. त्याला विश्वचषकात (T20 World Cup) स्टॅंड बॉय म्हणून निवड केल्याने टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी निवड समितीवरती जोरदार टीका केली होती. टीममध्ये त्याची निवड झाल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.
मोहम्मद शमीने नुकताच एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामुळे त्याने लोकांना सल्ला दिला. व्हायरल व्हिडीओमध्ये तो लोकांना प्रेम करु नका असा सल्ला देत आहे. त्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये तो ‘ओ राजू प्यार ना करियो, दिल टूट जाता है’ हे गाणं म्हणतं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रेम करू नका अशी चर्चा सुरु केली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.