Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड संथ खेळीमुळे पुन्हा चर्चेत, मीम्सचा रेकॉर्ड

| Updated on: Oct 07, 2022 | 12:53 PM

सोशल माीडियावर व्हायरल झालेले मीम्स तुम्ही पाहिले का ?

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड संथ खेळीमुळे पुन्हा चर्चेत, मीम्सचा रेकॉर्ड
Ruturaj Gaikwad
Image Credit source: twitter
Follow us on

आयपीएलमध्ये (IPL) चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) आफ्रिकेविरुद्धच्या (SA) पहिल्या सामन्यात अधिक संघर्ष करावा लागला आहे. काल त्याने इतकी संथ खेळी केली. क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याला प्रचंड सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केलं आहे. कालच्या सामन्यात पाऊस पडल्याने खेळाडूंना खेळत असताना अनेक अडचणी जाणवत होत्या. तरी सुद्धा टीम इंडियाचा नऊ धावांनी पराभव झाला.

ऋतुराज गायकवाडने कालच्या सामन्यात 49 चेंडूत 19 धावा केल्या, विशेष म्हणजे कालच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड सेट व्हायला अधिक वेळ घेतला. परंतु काही वेळाने तो बाद झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत चैन्नई सुपर किंग्ज टीमकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तो यंदा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने 16 मॅचमध्ये 635 धावा केल्या आहेत.

कालच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने खराब कामगिरी केल्यामुळे त्याचे नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत. ऋतुराज गायकवाडला टॅग करीत त्यांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.