हैदराबाद : जर तुम्हाला कुणी विचारलं की क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग कुणी केला तर उत्तर देणं एवढं सोपं नाही. बरं यात युसूफ पठाणने महत्वाची भूमिका निभावली होती असं सांगितलं तर आश्चर्य नक्कीच नाही वाटणार. पण हे सत्य आहे. हा सामना 2010 साली झाला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये युसूफ पठाणच्या (Yusuf Pathan) टीमनं हा करिश्मा करुन दाखवला होता. युसूफ पठाणच्या टीमनं थोडं थोडक्या नाही तर 536 रन्सचा पाठलाग करत इतिहास घडवला होता. विशेष म्हणजे यात 5 शतकं लागली होती. ज्यातले चार शतक हे दोन खेळाडूंनी मारले होते. (duleep trophy 2009 10 final west zone vs south zone yusuf pathan double century big chase before 10 years)
हा दुलिप ट्रॉफिचा फायनल ( Duleep Trophy final of the 2009-10) मुकाबला होता. आमने सामने होत्या दोन टीम. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन (south zone vs west zone final). सामन्याची तारीख होती 2 ते 6 फेब्रुवारी. सामना खेळवला गेला हैदराबादमध्ये. साऊथ झोननं प्रथम फलंदाजी करत 400 रन्सचा डोंगर उभा केला. यात एकट्या दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) 226 चेंडुत 25 चौके आणि षटकाराच्या मदतीनं 183 रन्स केल्या. त्याच्याशिवाय गणेश सतीशनं (Ganesh Satish) 53 आणि चिदंबरम गौतमने 49 रन्स केल्या. वेस्ट झोनकडून इरफान पठाणने (Irfan Pathan) पाच विकेट घेतल्या.
साऊथ झोनच्या लक्ष्याचा पाठिंबा करताना पूर्ण टीम 251 रन्समध्ये आऊट झाली. युसूफ पठाणने सर्वात जास्त 108 रन्स काढल्या. 76 बॉल्समध्ये 12 चौके आणि 5 छक्के मारले. त्यानंतर दहाव्या नंबरला आलेल्या धवल कुलकर्णीनं (Dhawal Kulkarni) 27 धावा कुटल्या. युसूफनंतरचा धवलच्याच रन्स सर्वाधिक होत्या. साऊथ झोनसाठी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होता (chandrashekhar ganapathy ) चंद्रशेखर गणपती. त्यानं पाच विकेट घेतल्या. त्यानंतर साऊथ झोननं दुसऱ्या सत्रात 9 विकेट गमावून 386 रन्सवर खेळ घोषीत केला. कप्तान कार्तिकनं पुन्हा बॅटींगमध्ये कमाल केली. 162 रन्सवर दीडशे रन्स ठोकल्या. त्यात 22 चौके मारले. चिदंबरम गौतमनं 88 रन्स केल्या. यावेळेस धवल कुलकर्णीनं पाच विकेटस् घेतल्या.
वेस्ट झोनला विजयासाठी 536 रन्सचं टार्गेट मिळालं. चिराग पाठक आणि हर्षद खादीवालेनं टीमला मजबुत सुरुवात करुन दिली. चिरागनं 168 बॉल्समध्ये 130 रन्स काढल्या तर हर्षदनं 45. तिसऱ्या नंबरवर आलेल्या वसिम जाफरनं 66 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. पण त्यानंतरचा खेळ हा युसूफ पठाणच्या नावावर राहीला. मैदानाचा असा एकही कोना सोडला नाही जिथं युसूफनं रन्स मारल्या नाही. बघता बघता त्याची डबल सेंच्युरी झाली. जेव्हा तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा इतिहास रचला गेला होता.
संबंधित बातम्या :
Vijay Hazare Trophy 2021 चा थरार रंगणार, वेळापत्रक जाहीर
(duleep trophy 2009 10 final west zone vs south zone yusuf pathan double century big chase before 10 years)