सीडनी : श्रीलंका (SL) आणि इंग्लंड (ENG) यांच्यातील मॅच सिडनी येथे सुरु आहे. आजची मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची असल्यामुळे मैदानात चुरस पाहायला मिळत आहे. श्रीलंका टीमने टॉस (TOSS) जिंकून प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंका टीमची धावसंख्या 142 झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून इंग्लंडचे दोन्ही फलंदाज मैदानात उतरले आहेत.
पाथुम निसांका याने 67 धावांची खेळी केली, तर कुसल मेंडिस 18 धावांची खेळी केली. भानुका राजपक्षा याने सुध्दा 22 धावा काढल्या त्यामुळे श्रीलंका टीमची धावसंख्या 142 झाली.
Brilliant bowling at the death helps England restrict Sri Lanka to 141/8 ?#T20WorldCup | #SLvENG | ?: https://t.co/goECJqYlQs pic.twitter.com/Jg03XijrhB
— ICC (@ICC) November 5, 2022
इंग्लंड टीमची धावसंख्या पाच ओव्हरमध्ये 60 झाली आहे. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या जोडीने चांगली सुरुवात केली आहे.
इंग्लंड टीम
जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, सॅम कुरान, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
श्रीलंका टीम
पाथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्शाना, लाहिरू कुमारा, कसून राजिथा