मुंबई : इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्याची बॅग स्टेशनवरून चोरी झाल्याने त्याला धक्का बसला. या बॅगेत काही कपडे आणि सामान होतं. याबाबतची माहिती खुद्द बेन स्टोक्सनं ट्विटरवर दिली आहे. चोरीची ही घटना लंडनच्या किंग्स कॉस रेल्वे स्टेशनवर घडली. बॅग चोरीची घटना घडल्यानंतर बेन स्टोक्सनं आपला राग व्यक्त केला आहे. बेन स्टोक्सनं ट्विटरवर चोराला सज्जड दम देत इशारा दिला आहे.
बेन स्टोक्सनं ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘ज्याने कोणी किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवरून माझी बॅग चोरली आहे. मला आशा आहे की, माझे कपडे तुझ्यासाठी खूप मोठे होतील. खरंच.’ या पोस्टनंतर त्याने राग व्यक्त करणारा इमोजी टाकला आहे.
To who ever stole my bag at King’s Cross train station.
I hope my clothes are to big for you ya absolute ****** ?— Ben Stokes (@benstokes38) March 12, 2023
चोरीच्या घटनेची माहिती सोशल मीडियावर येताच मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी या पोस्ट खाली आपल्या अंदाजात उत्तर दिली आहे. काही मीम्स इतके मजेशीर आहेत की हसू आवरत नाही. एका भारतीय फॅनने सीआयडी फेम शिवाजी साटम यांचा फोटो शेअर करत चौकशीची मागणी केली आहे. तर दुसऱ्या फॅनने बेन स्टोक्स बॅग ब्रिटिश म्युझियममध्ये शोधण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच काय तर एका मीम्समध्ये बाबर आझमला कपडे बरोबर येत असल्याचं दाखवलं आहे.
Dont worry, CID is working on it pic.twitter.com/bEzAndpHqA
— Blunt 3.0 (@0_blunt2) March 12, 2023
Fit aa rhe hein bilkul ??? pic.twitter.com/BqiuquH6Rd
— Krishnna Xi ✨️ (@Raman95736766) March 13, 2023
Check here,
All stolen goods are available here… ? pic.twitter.com/Q7Zp02Oj2c— Priyaanka (@Priyank_hahaha) March 13, 2023
न्यूझीलँड विरुद्धची कसोटी मालिका ड्रॉ झाल्यानंतर आता बेन स्टोक्स आयपीएल 2023 साठी सज्ज आहे. लवकरच बेन स्टोक्स भारतात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 मध्ये लिलावात बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयात संघात सहभागी केलं आहे. बेन स्टोक्स दोन वर्षानंतर आयपीएल खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी क्रिकबजशी बोलताना सांगितलं की, “बीसीसीआयने आम्हाला लिलावापूर्वीच सांगितलं होतं की इंग्लंडचे खेळाडू पूर्ण सीझनमध्ये खेळण्यास उपलब्ध असतील.”
दुसरीकडे, 16 जूनपासून बर्मिंघम येथे एशेज सुरु होणार आहे. यासाठी बेन स्टोक्सने आयपीएल खेळू नये असा सल्ला माजी कर्णधार मायकल वॉन याने दिला आहे. कारण एशेजसाठी बेन स्टोक्स पूर्णपणे फीट असणं गरजेचं आहे.
31 वर्षीय बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात 3-0 ने पराभूत केलं.न्यूझीलँड विरुद्धची मालिका बरोबरीत सुटली. इंग्लंडला टी 20 चॅम्पियन बनवण्यातही बेन स्टोक्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्टोक्स चांगलाच फॉर्मात आहे, पण त्याच्या फीटनेसमध्ये चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे आयपीएल 2023 खेळेल की नाही याबाबत शंका आहे.