नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघानं (Womens Cricket Team) होव्ह येथील काऊंटी ग्राउंडवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा (ENG vs IND) सात गडी राखून पराभव केला. या दोघींशिवाय यास्तिका भाटियानेही शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 50 षटकांत 7 गडी गमावून 227 धावांवर रोखले. भारताने हे लक्ष्य तीन गडी गमावून पूर्ण केले.
India win comprehensively to take a 1-0 lead in the ODI series ??#ENGvIND | #IWC | Scorecard: https://t.co/h9adyFyBCC pic.twitter.com/MfvRN4AZGS
— ICC (@ICC) September 18, 2022
भारताकडून मंधानानं शानदार खेळी खेळली आणि 91 धावा केल्या. या डावात तिनं 99 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकारांसह एक षटकार ठोकला. भाटियानं 47 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली ज्यात तिनं 8 चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार हरमनप्रीत 74 धावांवर नाबाद राहिली. तिनं 94 चेंडूंचा सामना केला आणि सात चौकारांसह एक षटकार ठोकला.
228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मात्र चांगली सुरुवात करता आली नाही. दुसऱ्या षटकातच संघाने शेफाली वर्माची विकेट गमावली. ती एक धाव काढून बाद झाली. यानंतर भाटिया आणि मंधाना यांनी संघाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. एकूण 99 धावांवर भाटिया बाद झाला.
मंधानाला कर्णधाराची साथ मिळाली आणि त्यानंतर दोघींनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा कडवा क्लास घेतला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. मंधना एकूण 119 धावांवर बाद झाली. पण तिनं संघाला विजयाच्या जवळ आणलं होतं. कर्णधार हरमनप्रीतनं हे काम शेवटपर्यंत नेलं. ती शेवटपर्यंत विकेटवर राहिली आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतली. हरलीन देओल सहा धावा करून नाबाद परतली.