चेन्नई : इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात टीम इंडियाच्या दौऱ्यावर (England Tour India 2021) येणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेत इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) विक्रम करण्याची संधी आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी जेम्सला अवघ्या काही विकेट्सची आवश्यकता आहे. (england tour india 2021 James Anderson have chance to break anil kumble most wickets record in test match)
जेम्सला भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 619 विकेट्ससह कुंबळे तिसऱ्या तर जेम्स 606 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जेम्सला कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी केवळ 13 विकेट्सची आवश्यकता आहे.
कुंबळेने एकूण 132 सामन्यातील 236 डावांमध्ये 619 विकेट्स घेतल्या आहेत. 74 धावा देऊन 10 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. तर जेम्सने 157 कसोटींमधील 292 डावात 606 विकेट्स घेतल्या आहेत. 42 धावा देत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
सध्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी खेळण्यात येत आहे. या सामन्यात जेम्सने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं बाकी आहे. म्हणजेच जेम्सला या दुसऱ्या डावात आणखी विकेट्स घेण्याची संधी आहे. यामुळे कुंबळे आणि जेम्स यांच्यातील विकेट्सचे अंतर आणखी कमी होईल. त्यामुळे भारत दौऱ्यावर कुंबळेचा विक्रम मोडीत काढणं आणखी सोप्पं जाणार आहे.
अँडरसनने आशिया खंडातील 23 कसोटी सामन्यात 66 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी 26 विकेट्स या त्याने टीम इंडियाविरोधात घेतल्या आहेत. जेम्स श्रीलंकेत एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा वरिष्ठ गोलंदाज आहे.
या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13-17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. या 2 सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जेम्स कुंबळेचा रेकॉर्ड मोडणार की टीम इंडिया विक्रम अबाधित राखण्यास यशस्वी होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.
संबंधित बातम्या :
(england tour india 2021 James Anderson have chance to break anil kumble most wickets record in test match)