England vs Australia, Final | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाची काँटे की टक्कर, फायनल वन डे कोण जिंकणार?

| Updated on: Sep 16, 2020 | 4:53 PM

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (16 सप्टेंबर ) एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. (England vs australia final match)

England vs Australia, Final | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाची काँटे की टक्कर, फायनल वन डे कोण जिंकणार?
Follow us on

मॅंचेस्टर : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (16 सप्टेंबर ) एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी याआधी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा आणि अंतिम सामना कोणता संघ जिंकतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  (England vs Australia final match in manchester)

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पहिल्या वनडे सामन्यात 19 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 295 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र इंग्लंडला केवळ 276 धावाच करता आल्या. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची योग्य सुरुवात झाली. मात्र इंग्लंड गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने अक्षरक्ष: लोटांगण घातलं. ऑस्ट्रेलियाचा डाव अगदी पत्त्यांसारखा कोसळला. ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम करण या त्रिकूटाने प्रत्येकी 3 विकेट घेतले.

कॅप्टन फिंचला 5 हजार धावांची संधी

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अॅरॉन फिंच याला वनडे क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 29 धावांची गरज आहे. फिंचला पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला मोठी खेळी करण्यास अपयश आले. फिंचने पहिल्या सामन्यात 16 तर दुसऱ्या सामन्यात 73 धावा केल्या.

मॅक्सवेलला 3 हजारांचा टप्पा गाठण्याची संधी

यासोबतच आक्रमक खेळाडू अशी ओळख असलेल्या ग्लेन मॅक्सवेल याला वनडे कारकिर्दीत 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. मॅक्सवेलला 3 हजारचा पल्ला गाठण्यासाठी 45 धावांची गरज आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 77 धावा केल्या. मात्र दुसऱ्या वनडेत मॅक्सवेलला अवघी 1 धाव करता आली. त्यामुळे अंतिम सामन्यात फिंच आणि मॅक्सवेल या दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

ऑस्ट्रेलियाला जोफ्रा आर्चरपासून धोका

ऑस्ट्रेलियाला जोफ्रा आर्चरपासून धोका असणार आहे. आर्चरने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 3 विकेट घेत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे आर्चर विरोधात सावधरित्या खेळण्याचं आव्हान असेल.

तसेच दुसऱ्याबाजूला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पा बॉलिंगने कमाल दाखवत आहे. झॅम्पाने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात एकूण 7 विकेट घेतले आहेत. त्यामुळे इंग्लंडलादेखील झॅम्पापासून सावधानीने खेळावं लागणार आहे.

दरम्यान यावनडे सीरिजआधी दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने पराभव केला. त्यामुळे वनडे मालिकाही जिंकून ऑस्ट्रेलियाचा सूपडा साफ करण्याचा मानस इंग्लंडचा असेल. तर टी-20 मालिका पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल.

इंग्लंड संघ : इयन मॉर्गन (कर्णधार), जॉस बटलर (विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, सॅम बिलिंग्ज, ख्रिस वॉक्स, सॅम करण, टॉम करण, आदिल राशिद, जोफ्रा आर्चर, मोईन अली, मार्क वुड आणि टॉम बंटन

ऑस्ट्रेलिया संघ : अॅरॉन फिंच (कॅप्टन), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, मार्नस लॅबस्चॅग्ने, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, जोश हेजलवुड, मॅथ्यू वेड, स्टीव्हन स्मिथ, केन रिचर्डसन, नॅथन लायन , सीन एबॉट, एश्टन अगर, एन्ड्र्यू टाय, रिले मेरीडिथ, डॅनियल सॅम, जोश फिलिप

 

संबंधित बातम्या :

मी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत

कुणीतरी येणार येणार गं!! अनुष्का-विराटकडे ‘गुड न्यूज’