मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England test) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर (Chennai test) पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या मालिकेसाठी भारताने 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत दुखापत आणि अन्य कारणांमुळे खेळू न शकलेले खेळाडू आता टीम इंडियात (Team India) परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आणखी मजबूत झाला आहे.
भारतीय संघात आता क्रिकेटतज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे ते अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीकडे. कारण हार्दिक पांड्याकडे मॅच फिरवण्याची क्षमता आहे, असा माजी क्रिकेटपटूंना विश्वास आहे. (England vs India first test at chennai all eyes on hardik pandya)
हार्दिक पांड्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मैदानात परतला आहे. एकीकडे दुखापत, दुसरीकडे वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवून, हार्दिक पांड्या इंग्लंडशी दोन हात करणार आहे. मात्र दुखापतीमुळे त्याने अद्याप गोलंदाजीचा सराव सुरु केलेला नाही. पांड्या नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये केवळ फलंदाज म्हणून पांड्याला स्थान मिळणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (world test championship) फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला 4 सामन्यांची मालिका किमान 2-0 ने तरी जिंकावी लागणार आहे. मात्र इंग्लंडसारखा तगडा संघ समोर असताना, भारतासमोर हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे विराट कोहली कोणत्या 11 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या मते, “भारतात खेळताना कदाचित हार्दिक पांड्याचं महत्त्व कळणार नाही, पण परदेशात पांड्यासारखा खेळाडू आवश्यक आहे. भारतात आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवडलं जातं. मात्र परदेशात पांड्याचं महत्त्व दहापटीने वाढतं”
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अत्यंत अटीतटीची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची भारताला चांगली संधी आहे. फायनलसाठी हार्दिक पांड्या महत्त्वाचा शिलेदार आहे, असंही दासगुप्ताने सांगितलं.
Back with #TeamIndia ?? Back on home soil ? Back in red ball cricket ? pic.twitter.com/hpnX1az60e
— hardik pandya (@hardikpandya7) February 4, 2021
पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी
दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी
तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
(England vs India first test at chennai all eyes on hardik pandya)
संबंधित बातम्या
IND Vs ENG : …म्हणून भारतीय संघ इंग्लंडला चारी मुंड्या चित करणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी