सीडनी : श्रीलंका (SL) आणि इंग्लंड (ENG) यांच्यातील मॅच सिडनी येथे थोड्याचवेळात सुरु होणार आहे. श्रीलंकेने सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजची मॅच (Match) दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अनेक टीमची चुरस मैदानात पाहायला मिळत आहे.
श्रीलंका टीमने 8 ओव्हरमध्ये 74 धावा काढल्या आहेत. श्रीलंका टीमचे दोन फलंदाज बाद झाले आहेत. टॉस जिंकल्याचा फायदा श्रीलंका टीमला होईल का ? विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड टीमने सुद्धा आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
England to take on Sri Lanka in Super 12 ICC #T20WorldCup today in Sydney in the final league match of Group 1.#ENGvsSL? pic.twitter.com/OLG7aJxvgx
— All India Radio News (@airnewsalerts) November 5, 2022
इंग्लंड टीम
जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, सॅम कुरान, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
श्रीलंका टीम
पाथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्शाना, लाहिरू कुमारा, कसून राजिथा