इंग्लंड : महिला क्रिकेट विश्वातील ‘धोनी’ अशी ओळख असलेल्या इंग्लंडची यष्टीरक्षक आणि फलंदाज सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Sarah Taylor retired) घेतली आहे. साराने वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा (Sarah Taylor retired) केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने याबाबतची माहिती (Sarah Taylor retired) दिली आहे. तसेच सारानेही स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. साराने आतापर्यंत 226 सामन्यात 6 हजार 533 धावा केल्या आहेत.
साराने इंग्लंडच्या महिला क्रिकेटमध्ये 13 वर्षे इतका वेळ घालवला आहे. सारा गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रासाला सामोरी जात आहे. तिच्या या त्रासामुळे तिने अनेकदा क्रिकेटपासून लांब राहावे लागलं आहे. मात्र यानंतर तिने साराने क्रिकेटला रामराम (Sarah Taylor retired) ठोकल्याची चर्चा सुरु आहे. साराला महिला क्रिकेट विश्वातील ‘धोनी’ म्हणून ओळखले जाते.
हा निर्णय घेणे खूप कठीण होते. पण निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. असे साराने ट्विट करत म्हटलं आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्या संघातील खेळाडू आणि ईसीबी यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. इंग्लंडच्या टीमसाठी इतक्या वर्षांपासून खेळणे हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहेत. 2006 मध्ये क्रिकेटची सुरुवात, अॅशेज मालिकेवर विजय, लॉर्डसमध्ये विश्वविजेता होणे हे सर्व क्षण मला नेहमी लक्षात राहतील असेही ती यावेळी म्हणाली.
In 2006 my dream came true and I beam with pride at what I’ve achieved over the years, alongside the best players and people. It is the right time for me and my health to retire, but I have loved every minute in an England shirt. Thank you to everyone for supporting me ❤️ pic.twitter.com/8MdTqpgmWe
— Sarah Taylor (@Sarah_Taylor30) September 27, 2019
“क्रिकेट हा खेळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला खेळत आहे. केवळ इंग्लंड नव्हे तर जगभरातील महिला क्रिकेटमध्ये सहभागी होत आहे. त्यात मी माझ्या एक छोटंसं सहकार्य दिले यावर आम्हला गर्व आहे. सारा इंग्लंडच्या टीमची रोल मॉडल आहे. तिची प्रेरणा घेऊन अनेक मुलींनी क्रिकेटला सुरुवात केली. असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.”
काही महिन्यांपूर्वी साराने न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. साराने महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी हा फोटो काढला असून त्यासोबत महत्वाचा संदेशदेखील दिला आहे आणि यासाठी तिचे कौतुकही झाले होते.
साराने इंग्लंडकडून 10 कसोटी सामन्यात 300 धावा केल्यात. त्याशिवाय 126 वन डे सामन्यात 4056 धावा केल्या असून 90 टी-20 सामन्यात 2 हजार 177 धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत 51 खेळांडूंना स्टम्प आऊट केलं आहे. साराने तिच्या कारकीर्दीत विकेटकीपर म्हणून 232 विकेट्स घेतल्या आहे. वेगवान महिला विकेटकीपर म्हणूनही तिची ओळख आहे. साराच्या विकेटकीपिंगची तुलना टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्याशीही केली गेली आहे.