मुंबई : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिकेने या वर्षाचा शेवट करणार आहे. नववर्षात अर्थात 2021 मध्ये टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) या दौऱ्याची घोषणा केली आहे. खरंतर इंग्लंडचा संघ जानेवारी 2020 मध्येच भारत दौऱ्यावर येणार होती. मात्र कोरोनामुळे इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला होता. England’s India tour schedule announced 2021
? #INDvENG schedule announced ?
? Four #WTC21 Tests: 5 February ➜ 8 March
? Five T20Is: 12 March ➜ 20 March
? Three CWC Super League ODIs: 23 March ➜ 28 MarchAre you ready? ? pic.twitter.com/7m0rWPsTBC
— ICC (@ICC) December 10, 2020
या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा डे नाईट असणार आहे.
We have confirmed our men's tour of India in 2021 ?
— England Cricket (@englandcricket) December 10, 2020
पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी
दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी
तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च
पहिला सामना – 12 मार्च
दुसरा सामना – 14 मार्च
तिसरा सामना – 16 मार्च
चौथा सामना – 18 मार्च
पाचवा सामना – 20 मार्च
NEWS ? : BCCI, ECB announce itinerary for England’s tour of India 2020-21.
More details here – https://t.co/LRckHxHpHx #INDvENG #TeamIndia pic.twitter.com/MdhRnmfx0s
— BCCI (@BCCI) December 10, 2020
पहिली मॅच – 23 मार्च
दूसरी मॅच – 26 मार्च
तिसरा मॅच – 28 मार्च
कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. विशेष म्हणजे हे पाचही सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमध्ये खेळण्यात येणार आहे. मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या टी 20 मालिकेनंतर सर्वात शेवटी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होईल. हे तिनही सामने पुण्यात (Pune) खेळले जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | टीम इंडियाला कसोटी मालिकेत विराटची उणीव भासेल : सचिन तेंडुलकर
England’s India tour schedule announced 2021