मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाला. पण या लोकप्रियतेची हवा त्याच्या एवढी डोक्यात गेली, की टीव्ही शोमध्ये बोलताना कुणाविषयी काय वक्तव्य करावं याचंही त्याला भान राहिलं नाही. याचाच परिणाम म्हणून पंड्यावर आता भारतीय संघातून बाहेर राहण्याची वेळ आली आहे.
हार्दिक पंड्या फॉर्मात असताना त्यांचं नाव बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण आता त्याचं ज्यांच्याशी नाव जोडलं जायचं, त्यांनीच पंड्याला ओळखण्यास नकार दिलाय. अभिनेत्री ईशा गुप्ताने हार्दिक पंड्यावर दिलेली प्रतिक्रिया पाहूनच आपण याचा अंदाज लावू शकतो. वाचा – BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?
बॉलीवूडमध्ये हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच असायची. दोघांची भेट एका पार्टीत झाली होती. अफेअरवर ईशा गुप्ताने स्पष्टीकरणही दिलं. लोकांचं चर्चा करणं कामच असतं. पण मी हे कबूल केलेलं नाही. ज्या चर्चा सुरु आहेत, त्याच्याशी मी सहमत नाही, असं ती म्हणाली. वाचा – निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट
महिलांविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं असल्याचं ईशाने म्हटलंय. महिला आणि पुरुषांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे या वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही, असं ईशा म्हणाली. मुंबईत ईशाच्या म्युझिक अल्बमचं लाँचिंग होतं. या कार्यक्रमातच तिला प्रश्न विचारण्यात आला.
काय आहे प्रकरण?
हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’
पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचे सांगितले गेले. पंड्याच्या या वक्तव्याला महिला विरोधी आणि सेक्सिस्ट म्हटले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली.