Virat kohli : विराट कोहली आऊट होताच चाहते संतापले, वाचा काय केल्या कमेंट्स

| Updated on: Dec 08, 2022 | 11:15 AM

विराट कोहली आऊट होताच चाहते संतापले

Virat kohli : विराट कोहली आऊट होताच चाहते संतापले, वाचा काय केल्या कमेंट्स
virat kohli
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात काल दुसरी एकदिवसीय मॅच झाली. कालच्या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जखमी झाल्यामुळे विराट कोहली आणि धवनने टीमचे नेतृत्व केले. बांगलादेशच्या पहिल्या सहा विकेट 100 धावांच्या आतमध्ये पडल्या होत्या. परंतु मधल्या फळीतील गोलंदाजांनी काल निराशा केली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला असल्याचं विराट कोहलीने (Virat kohli)म्हटलं आहे.

रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे विराट कोहलीने कालच्या सामन्यात ओपनिंग केली. परंतु तो अधिककाळ मैदानात स्थिरावला नाही. विराट कोहलीचा बोल्ड झाल्यानंतर टीम इंडियाचे चाहते निराश झाले. कारण बांगलादेशच्या खेळाडूंनी मोठी धावसंख्या उभारली होती. विराट कोहलीनंतर इतक्या धावा कोणता खेळाडू करणार अशी शंका चाहत्यांच्या मनात होती. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर निराश असल्याचे पाहायला मिळाले.

जखमी रोहित शर्माने काल अंतिम टप्प्यात जोरदार फलंदाजी केली. कमी चेंडूत अर्धशतक लगावल्यामुळे काही चाहत्यांनी त्याची तारिफ केली. तर काही चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली.