मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. छोट्या टीमने मोठ्या चांगल्या खेळाडू असणाऱ्या टीमला धक्का दिला आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक विशेष राहणार आहे. येत्या रविवारी टीम इंडियाची (Team India) पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी आत्तापासून त्याची चर्चा करायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे खेळाडू आणि टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून कसुन सराव करीत आहेत. नुकतेच विराट कोहली, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे तीन खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसले आहेत. त्यामुळे त्याची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
BABAR AZAM, VIRAT KOHLI & MUHAMMAD RIZWAN did a net session together ??? pic.twitter.com/iORWxRD4fl
— Javeriaaa (@jiyaa_aj) October 18, 2022
आशिया चषकात ज्यावेळी दोन्ही टीमची मॅच झाली होती. त्यावेळी सुध्दा दोन्ही टीममधला संघर्ष पाहायला मिळाला होता. दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू असून कोण कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.