FIFA World Cup 2022: फिफाची सुरुवात कुराणच्या पठणाने, पाहा व्हिडिओ

| Updated on: Nov 22, 2022 | 8:13 AM

कतार या देशाची लोकसंख्या साधारण 30 लाखांच्या आसपास आहे

FIFA World Cup 2022: फिफाची सुरुवात कुराणच्या पठणाने, पाहा व्हिडिओ
FIFA World Cup 2022
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : फिफाची (FIFA World Cup 2022) सुरुवात कशी होणार याकडे जगभरातील चाहत्यांचे (Fan) लक्ष लागून राहिले होते. परंतु फिफाची सुरुवात ज्यांनी पाहिली ती त्यांच्यासाठी अविस्मरणीय अशी होती. यावर्षी कतार (Qatar) या देशाने फिफा विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कतार या देशाची लोकसंख्या साधारण 30 लाखांच्या आसपास आहे. इंग्लंडचे अनेक खेळाडू आपल्या मित्र परिवारासह कतारमधील अलिशान जहाजमध्ये थांबले आहेत. 92 वर्षात प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धेची सुरुवात कुराणच्या पठणाने झाली आहे.

मागच्या 92 वर्षांपासून फिफा विश्वचषक स्पर्धा विविध देशात आयोजित केली जाते. प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धेला कुरआन-ए-पाकच्या पठणाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्यांदा असं घडलं असल्यामुळे इस्लाम धर्मियांच्या अनुयायांची मनं जिंकली आहेत. FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घटनासाठी कुराणचे वाचन करण्यासाठी मुलांना आमंत्रित करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटनाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मैदानात जवळपास 100 मुलं आली होती. मैदानात बसून मुलांनी कुराण पठणं केलं. लोकांची या गोष्टीची तारिफ केली आहे.

विशेष म्हणजे कालच्या कुराण वाचणानंतर अनेक लोकं आनंदी झाले आहेत, तर अनेकजण निराश झाले आहेत. कालची पहिली मॅच कतार आणि इक्वेडोर यांच्यात झाली. इक्वेडोर टीमने कालची मॅच 2-0 ने जिंकली. ज्यांनी कालच्या कुराण वाचणानंतर टीका केली, त्यांनी प्रत्येक धर्माचे लोकं कोणत्याही खेळात भाग घेत असतात किंवा सहभागी होत असतात असं म्हटलं आहे. अशावेळी मैदानात कुराण वाचन होण कितपत योग्य आहे.