मुंबई : फीफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup) यावेळी कतार (Qatar) देशात सुरु आहे. जगभरात लोकप्रिय असलेला फीफा विश्वचषक सध्या तीस लाख लोकसंख्या असलेल्या देशात खेळवला जात आहे. कतार देशाने चांगलं नियोजन केल्याची सुद्धा चर्चा आहे. जगभरातले काही फॅन्स कतार देशात पोहोचले आहेत. इंग्लंडचे खेळाडू (ENG) आणि चाहते त्यांच्या मित्र परिवारांसह आलिशान जहाजावर विश्वचषक संपेपर्यंत राहणार आहेत.
ज्या जहाजात खेळाडू आणि चाहते राहिले आहेत, त्याची किंमत सुमारे एक अब्ज पौंडच्या दरम्यान आहेत. विशेष म्हणजे हे जहाज पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. त्यामुळे खेळाडू आणि चाहते जहाजावर तळ ठोकून राहिले आहेत.
MSC World Europa असं त्या जहाजाचं नावं आहे. त्या जहाजाची गणना जगातील मोठ्या जहाजांमध्ये केली जाते. त्यामध्ये 33 बार, कॅफे, 14 पूल, 13 जेवणाचे ठिकाण, 6 जलतरण तलाव अशी सगळी व्यवस्था आहे. विशेष म्हणजे राहणाऱ्या लोकांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये.
ही जहाज कतारमधील दोहामधील समुद्रकिनाऱ्यावर विश्वचषक संपेपर्यंत उभी राहणार आहे. या संपुर्ण जहाजात 7000 लोकं राहतील अशी व्यवस्था आहे. सध्या तिथं राहणारे लोकं इंग्लंडच्या खेळाडूंचे नातेवाईक आणि मित्र आहेत अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
जगभरात मिळणारे प्रसिद्ध तिथं राहणाऱ्या लोकांसाठी ठेवण्यात आले आहेत. कारण तिथं राहणारा कोणताही चाहता निराश झाला नाही, पाहिजे. 2500 हून अधिक केबिनची व्यवस्था आहे. संपुर्ण जहाजात 21 मॉलमध्ये आहेत. बेड, वॉर्डरोब, बाथरूम, टीव्ही अशा सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.