IPL 2022, Points Table : गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी?, जाणून घ्या

| Updated on: Apr 28, 2022 | 9:35 AM

काल आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरातने विजय मिळवलाय. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय.

IPL 2022, Points Table : गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी?, जाणून घ्या
गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा केन विलियमसनच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध (GT vs SRH) सामना झाला.  गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) काल हरलेला सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला राशिद खान. (Rashid Khan) सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय. गुजरातने आगेकुच केलीय. कालच्या सामन्यानंतर गुजरात आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकला असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी हैदराबाद संघ कायम आहे. त्याने आठ सामन्यापैकी पाच सामने जिंकले असून तीन सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

पॉईंट्स टेबलमध्ये टॉप पाच संघ

कालच्या सामन्यापूर्वी आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या स्थानी आहे. मात्र, गुजरातने आठ सामन्यांपैकी कालचा सामना धरून सात सामने जिंकले आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी राजस्थान आहे. या संघाने आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात या संघाला अपयश आलंय. तिसऱ्या स्थानी हैरदाबाद संघ आहे. हैदराबाद संघाने आठपैकी पाच सामने जिंकले असून तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने एकूण सात सामने खेळल लखनौ सुपर जायंट्स असून त्याने आठ सामन्यांपैकी पाच सामन्यात त्यांना यश आलंय तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर पाचव्या स्थानी आरसीबी संघ आहे. या संघाने कालचा सामना धरून एकूण नऊ सामने खेळले आहे. त्यापैकी त्याला पाच सामन्यात यश आलंय तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

उमरान मलिकने जिंकलं

गुजरातने हा सामना जिंकला असला, तरी सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूने काल जबरदस्त कामगिरी केली. आयपीएल सुरु झाल्यापासून त्याच्या नावाची चर्चा आहे, तो म्हणजे उमरान मलिक. उमरानने काल भेदक स्पेल दाखवला. त्याने चार षटकात 25 धावा देत पाच विकेट काढल्या. त्याने एकट्याने गुजरातचा निम्मा संघ गारद केला. महत्त्वाच म्हणजे त्याने काढलेल्या चार विकेट या क्लीन बोल्डच्या होत्या. त्याच्या परफेक्ट यॉर्करचं गुजरातच्या फलंदाजांकडे कुठलही उत्तर नव्हतं. त्यामुळे या युवा गोलंदाजाचं कराव तेवढं, कौतुक थोडं आहे.