मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चेत असतो. तो नेहमी क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला देत असतो. सध्या गंभीरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय परदेशी प्रशिक्षकावर पैसा खर्च करण्यापेक्षा भारतातल्या खेळाडूला ती संधी द्या. त्यांच्यावर पैसा खर्च झाला तरी चालतोय असं गंभीरचं म्हणणं आहे. गंभीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून त्यावर अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले आहेत.
परदेशातले प्रशिक्षक येतात, दिलेल्या वेळेत काम करतात आणि पैसा घेऊन जातात असं गंभीरने व्हिडीओत म्हटलं आहे. काल त्याने सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. राहूल द्रविड, अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांची त्याने बाजू घेतली आहे. भारतात क्रिकेटच्या बाबतीत अनेक चाहते भावनिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.
मागच्या सहा-सात वर्षापासून टीम इंडियाला योग्य प्रशिक्षक मिळत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी परदेशात जाऊन प्रशिक्षक व्हायला हरकत नाही. सहसा, परदेशातील खेळाडू प्रशिक्षक होतात, पैसा कमावतात आणि निघून जातात असा आरोप गंभीरने केला आहे.
विश्वचषक स्पर्धेत ज्यावेळी टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी टीम इंडियामधील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर गंभीरने जोरदार टीका केली होती.