मुंबई : क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने दमदार कामगिरी करुन आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाचा असतो. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकदातरी हॅटट्रिक घेता यावी, यासाठी अनेक बोलर्स कठोर परिश्रम घेतात. नेट्समध्ये जोरदार सराव करतात. मात्र सर्वच यशस्वी होत नाहीत. सलग 3 फलंदाजांना बाद करण्यासाठी गोलंदाजाकडे स्कील असावी लागते. काही वर्षांपूर्वी एक असाच गोलंदाज होवून गेला ज्याने 2 वर्षात 2 हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. ह्यू ट्रंबल (Hugh Trumble) असं या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचं नाव. ह्यू यांचा आज वाढदिवस. (former australian bowling all rounder Hugh Trumble become 1st cricketer who take 2 hat trick born on this day)
ट्रंबल हे ऑफ स्पिनर होते. त्यांनी 1901-02 मध्ये पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली होती. तर त्यानंतर 1903-04 मध्ये दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा घेण्याचा किर्तीमान आपल्या नावे केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही हॅटट्रिक त्यांनी मेलबर्नमध्ये घेतल्या होत्या. या उंचपुऱ्या गोलंदाजाला त्याच्या उंचीचा फायदा बोलिंग करताना व्हायचा. चेंडू खेळपट्टीवर वेगाने टर्न व्हायची. ट्रंबल यांनी 1896 मध्ये इंग्लंड विरुद्ध द ओवलमध्ये कसोटी सामन्यात 89 धावांच्या मोबदल्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या. ट्रंबल यांनी या सामन्यातील पहिल्या डावात 59 धावा देत 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या डावात 30 धावांच्या मोबदल्याच 6 विकेट्स पटकावल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 111 धावांची आव्हान मिळाले होते. मात्र कांगारुंचा डाव अवघ्या 44 धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाची 8 बाद 19 अशी स्थिती झाली होती. दरम्यान त्यांनी अखेरच्या प्रथम श्रेणी सामन्यात 28 धावा देत 7 विकेट्स घेत इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकललं होतं. या 7 विकेट्सच्या दरम्यान त्यांनी कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.
ट्रंबल हे चांगले फलंदाजही होते. त्यांनी कसोटीमध्ये 4 अर्धशतक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3 शतकं झळकावली होती. ऑस्ट्रेलिया 1899 मध्ये क्रिकेट दौऱ्यावर गेली होती. त्यावेळेस ट्रंबल 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करायचे. मात्र या दौऱ्यात त्यांना थेट सलामी करण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी 100 विकेट्स आणि 1000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. ट्रंबलने 32 कसोटींमध्ये 851 धावांसह 141 विकेट्सही घेतल्या. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 213 सामन्यात 5 हजार 395 धावा कुटल्या. तर 929 विकेट्सही त्यांनी पटकावल्या. 39 धावा देऊन 9 विकेट्स ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी होती. ट्रंबल यांनी 1939 मध्ये जगाचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या :
(former australian bowling all rounder Hugh Trumble become 1st cricketer who take 2 hat trick born on this day)