इंदापुरात येऊन जेव्हा अझरुद्दीन म्हणतात… ‘मी पुन्हा येईन’

| Updated on: Feb 22, 2021 | 7:53 AM

विजेत्यांना मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. (Mohammad Azharuddin Indapur Cricket Tournament)

इंदापुरात येऊन जेव्हा अझरुद्दीन म्हणतात... मी पुन्हा येईन
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन
Follow us on

इंदापूर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Former Cricketer Mohammad Azharuddin attends Indapur Cricket Tournament) यांनी इंदापुरात हजेरी लावली. क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अझरुद्दीन इंदापुरात उपस्थित राहिले होते. अझरुद्दीन यांनी स्पर्धेच्या नियोजनावर खुश होत पुन्हा येण्याचं आश्वासन दिलं.

इंदापूर नगरीत सुरु असलेल्या ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक कै. डॉ. लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 या स्पर्धेच्या शेवटचा दिवशी अंतिम सामन्यांचा शुभारंभ मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्यांना मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

‘मी पुन्हा येईन’

या स्पर्धेचा अंतिम सामना वीरविजय अकलूज या संघाने जिंकला. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनावर खुश होऊन मी पुन्हा इंदापूरला येईन, असे आश्वासन यावेळी अझरुद्दीन यांनी दिले.

मोहम्मद अझरुद्दीनची कारकीर्द

मोहम्मद अझरुद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीची सुरुवात इंग्लंड विरुद्ध 1985 मध्ये केली होती. त्यांनी 99 कसोटीत 45.03 च्या सरासरीने 6215 धावा केल्या आहेत. 199 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. अझरुद्दीन यांनी कसोटी सामन्यात 22 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत.

1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामना खेळताना त्यांनी फक्त 87 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. एक शानदार डाव खेळूनही त्यांनी सामना गमावला होता. कोलकात्यातील ईडन गार्डन्स हे अझर यांचे आवडीचे मैदान असून तिथे त्यांनी सात कसोटी सामन्यात पाच शतकं ठोकली आहेत. 103 वनडे सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. (Former Cricketer Mohammad Azharuddin attends Indapur Cricket Tournament)

राजकारणातही प्रवेश

19 फेब्रुवारी 2009 रोजी मोहम्मद अझरुद्दीन यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कुंवर सर्वेश कुमार सिंगचा पराभव केला. त्या निवडणुकीत त्यांना 50 हजाराहून अधिक मते मिळाली होती.

संबंधित बातम्या :

Video : गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट,हा भन्नाट षटकार पाहाच!

अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनासाठी धावून आला सचिनचा कट्टर मित्र, म्हणाला…

(Former Cricketer Mohammad Azharuddin attends Indapur Cricket Tournament)