मुंबई : सौराष्ट्रचे माजी वेगवान गोलंदाज तथआ बीसीसीआय रेफ्री राजेंद्रसिंह जडेजा (Rajendrasinh Jadeja) यांचं कोरोनाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाविरोधातली लढाई लढत होते. मात्र कोरोनाविरुद्धची मॅच जिंकण्यात त्यांना अपयश आलं. सौराष्ट्र क्रिकेट संघाने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. (Former Cricketer Rajendrasinh Jadeja Dies Due To Covid 19)
“कोरोनाशी लढताना राजेंद्रसिंह जडेजा यांचं दु:खद निधन झालंय. आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत. सौराष्ट्रच्या महान क्रिकेटपटूंपैकी ते एक होते. आज आम्हाला खूप दु:ख होतंय. ते आज आपल्यात नाहीत. त्यांना आदरांजली..”, अशा भावना सौराष्ट्र क्रिकेट संघाने व्यक्त केल्या आहेत.
राजेंद्रसिंह जडेजा उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचे त्याचबरोबर ते एक चांगले ऑलराऊंडर देखील होते. त्यांनी 50 फर्स्ट क्लास मॅचेस 134 विकेट्स घेतल्या, 11 लिस्ट ए मॅचेसमध्ये 14 फलंदाजांना माघारी धाडलं. 50 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये त्यांच्या नावावर 1536 रन्स आहेत तर 14 लिस्ट ए मॅचेसमध्ये त्यांच्या नावावर 104 रन्स आहेत.
जडेजा यांनी 53 प्रथम श्रेणी, 18 लिस्ट ए आणि 34 टी ट्वेन्टी सामन्यात बीसीसीआयचे रेफ्री म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या उत्तम खेळाबद्दल आणि रेफ्री कामाबद्दल त्यांना पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. जडेजा सौराष्ट्र क्रिकेटच्या निवड समितीत देखील होते.
सौराष्ट्र क्रिकेट संघातील अनेक सहकारी खेळाडूंनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने सौराष्ट्र क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
(Former Cricketer Rajendrasinh Jadeja Dies Due To Covid 19)
हे ही वाचा :
‘अतुल्य भारताचा सन्मान करा’, भारतविरोधी वार्तांकन करणाऱ्या जागतिक मीडियाला मॅथ्यू हेडनने खडसावले
‘आपल्या प्रियजणांना जपा’, आईवडिलांचा कोरोनाविरोधात लढा, युजवेंद्र चहलची भावूक पोस्ट
“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”