मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनची पहिली मॅच आज होणार आहे. पाकिस्तान (Pakistan)विरुद्ध न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज सिडनीच्या मैदानात महामुकाबला पहायला मिळणार आहे. तसेच उद्या टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध एडलेडच्या मैदानात मॅच होणार आहे. टीम इंडियाने खेळाडूंनी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचे केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या हे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
इंग्लंडचा माजी खेळाडू हुसेन याने ‘द डेली मेल’साठी एक कॉलम लिहिला आहे. त्यामध्ये रवी शास्त्री यांनी काहीतरी बदल करायला पाहिजे असं लिहिलं आहे. सध्या टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू असे आहेत, की त्यांनी चुकीच्या पद्धतीने क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हुसैन डरपोक म्हणाला आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली, सुर्यकुमार यादव या दोन चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची तारिफ केली आहे. तसेच दिनेश कार्तिकच्या जागेवर ऋषभ पंतला संधी द्यावी असंही हुसैन यांनी त्या लेखात म्हटलं आहे.