दुबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) अजूनही आपल्या संघापासून दूर आहे. आयपीएलच्या या हंगामात तो राजस्थानच्या संघात सहभागी झाला नाही. वैयक्तिक कारणामुळे स्टोक्सला अजूनही सहभागी होता आले नाही. दरम्यान आता स्टोक्सला आयपीएलच्या या हंगामालाच मुकावे लागू शकते, असा धक्कादायक खुलासा इंग्लंडचा माजी फिरकीपटु मॉन्टी पायनेसरने केला आहे. ( monty panesar on ben stokes )
“बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती स्थिर नाही. यामुळे बेन स्टोक्स त्यांच्या वडिलांसोबत न्यूझीलंडमध्येच आहे. त्यामुळे स्टोक्सला कदाचित आयपीएलच्या या हंगामात खेळता येणार नाही”, असा खुलासा पायनेसरने केला आहे. पायनेसरने टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना हा खुलासा केला आहे.
“बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडू आहे. तो जर या हंगामात खेळण्यासाठी तयार झाला तर, राजस्थानसाठी ही जमेची बाजू ठरेल. स्टोक्स हा क्रिकेटमधील सुपरमॅन आहे. तो एकहाती सामाना फिरवण्याची क्षमता ठेवतो”, असंही पायनेसर म्हणाला.
बेन स्टोक्स ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राजस्थानशी जोडला जाईल, असे वृत्त इंग्लंडच्या माध्यामांनी दिले होते. मात्र आता पायनेसरने स्टोक्सबद्दल वेगळाच खुलासा केला आहे.
बेन स्टोक्स हा राजस्थानचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत राजस्थानसाठी चांगली कामगिरी केली आहे. जर बेन स्टोक्स आयपीएलच्या या मोसमात राजस्थानशी जोडला गेला नाही, तर राजस्थानसाठी हा मोठा धक्का असेल.
बेन स्टोक्सने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. यात त्याने 635 धावा केल्या आहेत. 103* नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर स्टोक्सने बोलिंगनेही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 34 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान बेन स्टोक्स आणि जॉस बटलर या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत राजस्थानने पहिल्या सामन्यात चेन्नईला सहज पराभूत केलं. या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार खेळी केली होती.
संबंधित बातम्या :
न्यूझीलंडची पराकोटीची खिलाडूवृत्ती, बेन स्टोक्सला ‘न्यूझीलंडर ऑफ द ईयर’चं नामांकन
वृत्तापत्राकडून सावत्र वडिलांविषयी खुलासा, वाचून बेन स्टोक्सला धक्का
( monty panesar on ben stokes )