मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव (Bowler Ashwin Yadav ) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर सध्या शोककळा पसरली आहे. आपल्या खास बोलिंग शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. अश्विन अवघ्या 33 वर्षांचा होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत. (Former Hydrabad Cricketer Ashwin yadav pass Away)
भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय, “अश्विन यादवच्या जाण्याने मी खूप दुखी झालोय, मला मोठा हादरा बसलाय, एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेलाय. तो ‘टीम मॅन’ होता. मी देवाकडे प्रार्थना करतो ती ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबाला देवो. क्रिकेटमध्ये नक्कीच अश्विनची कमी भासेल. ओम शांती”
Devastated to hear the news of #Ashwinyadav passing away. A Very jovial and fun loving guy, team man to the core, punched way above his skills as a fast bowler. I pray to God for strength to his family. #gonetooearly #OmShanti
You will be missed. pic.twitter.com/0gIuOKZr6L— R SRIDHAR (@coach_rsridhar) April 24, 2021
अश्विन यादवचा सहकारी खेळाडू ऑफ स्पिनर विशाल शर्मा यानेही शोक व्यक्त केला. तो म्हणाला, “अश्विनच्या चेहऱ्यावर कायम हसू हसायचं. तो कधी नाराज व्हायचा नाही. त्याला सतत हसतमुख आम्ही पाहिलंय. तो स्थानिक लीगमध्ये खूप उत्तम खेळायचा. मला विश्वासच बसत नाही की तो आता या जगात राहिला नाही”
अश्विन यादवने 2007 मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणारा यादवने 14 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 34 बळी घेतले. 2008-09 च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत 52 धावा देऊन 06 बळी घेतले.
अश्विनने शेवटचा रणजी सामना 2009 मध्ये मुंबई विरुद्ध खेळला. मात्र स्थानिक लीगमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद व त्यानंतर एसबीआयकडून खेळणे त्याने सुरुच ठेवले. त्याने 10 लिस्ट ए आणि दोन टी -20 सामने खेळले आहेत.
(Former Hydrabad Cricketer Ashwin yadav pass Away)
हे ही वाचा :
Video : हार्दिक पांड्याचा बायकोचा हा डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?, इंटरनेवर तुफान व्हायरल…!
Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!
IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!