मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे आज (17 जानेवारी) मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन (Bapu Nadkarni Died) झालं. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. नाडकर्णी यांचे जावई विजय खरे यांनी वृध्दापकाळामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. त्यांचे पूर्ण नाव रमेश गंगाराम नाडकर्णी असे असून त्यांना बापू नाडकर्णी या नावाने ओळखलं जातं. बापू यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली (Bapu Nadkarni Died) जात आहे.
बापू नाडकर्णी यांची गोलंदाजांच्या शैलीमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती. नाडकर्णी हे डावखुरी गोलंदाजी करायचे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळ्यात कमी धावा करणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ओळख होती. कसोटीत क्रिकेटमध्ये सलग 21 षटक मेडन टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात बापू नाडकर्णी यांनी 32 ओवर टाकल्या होत्या. त्यात 21 षटक या मेडन ओवर होत्या. विशेष म्हणजे 32 षटकात त्यांनी केवळ पाच धावा दिल्या होत्या.
Very sad to hear about the demise of Shri Bapu Nadkarni. I grew up hearing about the record of him bowling 21 consecutive maiden overs in a Test. My condolences to his family and dear ones.
Rest in Peace Sir?. pic.twitter.com/iXozzyPMLZ— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 17, 2020
बापू नाडकर्णी यांनी 41 कसोटी सामन्यात 1414 धावा केल्या. तर 88 विकेट्स घेतले. तर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 191 सामन्यात त्यांनी 500 विकेट्स घेतल्या. तर 8880 धावा केल्या. नाशिकमध्ये जन्मलेल्या नाडकर्णी यांनी 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यातून पदापर्ण केले. त्यांनी गोलंदाजीत अनेक पराक्रम केले. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वातला एक तारा निखळल्याची भावना क्रिकेटप्रेमींच्या मनात (Bapu Nadkarni Died) आहे.