टीम इंडियाच्या माजी खेळाडूला भर मैदानात हॉकी स्टिकने मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान चेअरमन अमित भंडारी यांना हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. अज्ञात टोळक्याने अमित भंडारींवर हल्ला करुन बेदम मारहाण केली. सेंट स्टीफन मैदानात अंडर 23 संघासोबत सराव सुरु असताना, हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमित भंडारी यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. […]

टीम इंडियाच्या माजी खेळाडूला भर मैदानात हॉकी स्टिकने मारहाण
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान चेअरमन अमित भंडारी यांना हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. अज्ञात टोळक्याने अमित भंडारींवर हल्ला करुन बेदम मारहाण केली. सेंट स्टीफन मैदानात अंडर 23 संघासोबत सराव सुरु असताना, हा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात अमित भंडारी यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ला करुन हल्लेखोर तातडीने पसार झाले.

या हल्ल्यानंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“या घटनेची चौकशी करत आहोत. मला मिळालेल्या माहितीनुसार, अंडर 23 राष्ट्रीय स्पर्धेत स्थान न मिळालेल्या एका असंतुष्ट खेळाडूने हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. दोषींना शिक्षा होईलच, आम्ही पोलिसात तक्रार केली असून मी स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्या पटनाईक यांच्याशी बोललो आहे. दोषींना कोणालाही सोडलं जाणार नाही”, असं रजत शर्मा म्हणाले.

दरम्यान, दिल्ली सिनीयर आणि अंडर 23 संघाचे मॅनेजर शंकर सैनी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

“मी आणि माझे सहकारी तंबूत जेवत होतो. त्यावेळी भंडारी हे निवड समितीचे अन्य सदस्यांसह आणि वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक मिथून मन्हास यांच्यासह संभाव्य खेळाडूंची ट्रायल मॅच पाहात होते. त्यावेळी काहीजण आले आणि ते थेट अमित भंडारींकडे गेले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर ते निघून गेले. आम्ही घडल्याप्रकाराची माहिती घेणार इतक्यात जवळपास 15 जण हॉकी स्टिक्स, रॉड आणि सायकलची चेन घेऊन आले आणि त्यांनी अमित भंडारींवर चाल केली. आम्ही सर्वजण त्यांना वाचवण्यासाठी गेलो, पण त्या टोळक्याने आम्हाला मध्ये पडू नका अन्यथा तुम्हालाच उडवू असा दम दिला. त्यांनी अमित भंडारींना हॉकी स्टिक्स आणि रॉडने डोक्यात बेदम मारहाण केली”, असं शंकर सैनी यांनी सांगितलं.