इस्लामाबाद : पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) 6 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांच्या आयोजनावरुन माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने (Javed Miandad) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) घरचा आहेर दिला आहे. पीसीएलच्या आयोजनावरुन मियाँदादने विरोध दर्शवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्च महिन्यात 5 सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान आता ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यासाठी पीसीबी प्रयत्नशील आहे. यावरुन मियाँदादने निशाणा साधला आहे. (Former Pakistan cricketer Javed Miandad opposes psl cricket tournamemt due to corona)
“सध्या सारं जग कोरोना विरुद्ध लढा देत आहे. त्यामुळे आपण सध्या पीसीएलऐवजी कोरोना या वैश्विक महामारी विरुद्ध लढायला हवं. ही वेळ क्रिकेट खेळायची नसून जीव वाचवाण्याची आहे. आपण सर्वांच्या जीवाची काळजी घ्यायला हवी. जगावर कोरोनाचं सावट आहे. भारतात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. तिथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे”, असं मियाँदादने स्पष्ट केलं.
“पीसीबी आर्थिक फायद्यासाठी या स्पर्धेंचं आयोजन करत असेल तर हे अयोग्य आहे. जर हे सर्व माझ्या हाती असतं तर मी इतकी मोठी जोखीम घेतली नसती. पीसीबीने जर या स्पर्धेचं आयोजन केलं अन कोणाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण”, असा प्रश्नही मियाँदादने यावेळेस उपस्थित केला.
मीडिया रिपोर्टनुसार, पीसीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे 1 जूनपासून करण्यात येऊ शकते. हे सामने यूएईमध्ये खेळवण्यात येऊ शकतात. दरम्यान काही कारणांमुळे या स्पर्धेचं जूनमध्ये आयोजन न झाल्यास स्पर्धा रद्द करावी लागले, याबाबतची माहिती पीसीबीने सर्व फ्रँचायजींना दिली आहे.
दरम्यान कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी आयपीएलचा 14 मोसम स्थगित करण्यात आला. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत होता. मात्र त्यानंतरही सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन सामने खेळवण्यात येत होते. मात्र त्यानंतरही बायो-बबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. अनेक खेळाडू पॉझिटिव्ह झाले. त्यामुळे बीसीसीआयने 4 मे ला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या :
(Former Pakistan cricketer Javed Miandad opposes psl cricket tournamemt due to corona)