कॅनबेरा : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सुरज रनदीवने (Suraj Randiv) आपलं क्षेत्र बदललं आहे. आता रनदीव थेट बस चालकाची नोकरी करत आहे. श्रीलंकेचा हा खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये बस चालकाची नोकरी (suraj randiv bus driver) करत आहे. रनदीव मेलबर्नमधील ट्रान्सडेव या कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. रणदीव यासोबतच तिथे एका स्थानिक क्लबसाठीही क्रिकेट खेळत आहे. (Former Sri Lankan cricketer Suraj Randiv is working as a bus driver in Australia)
श्रीलंकेच्या या खेळाडूने तिनही फॉरमेटमध्ये आपल्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच तो भारतात झालेल्या 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाचा सदस्य होता. रणदीवने एकूण 12 कसोटींमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. तर 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36 बळी मिळवले आहेत. तर 7 टी 20 मॅचेसमध्ये 7 फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. तसेच बॅटिंग करताना त्याने सर्वाधिक 56 धावा केल्या होत्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. सूरजने आपला अखेरचा देशांतर्गत सामना एप्रिल 2019 मध्ये खेळला होता.
रणदीव आता चालकाची भूमिका बजावत आहे. पण त्याने क्रिकेटसोबतचं नातं तोडलेलं नाही. आपली नोकरी सांभाळत तो ऑस्ट्रेलियामधील स्थानिक (Dandenong Cricket Club) डांडेनॉंग क्रिकेट कल्बमधून खेळतो आहे. या क्लबकडून जेम्स पॅटिन्सन आणि पीटर सीडलही खेळतात. जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, तेव्हा रणदीवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फिरकीचे धडे दिले होते.
Kept thinking about how this net bowler has the exact same action as former Sri Lankan office Suraj Randiv and turns out it’s Suraj Randiv himself #AUSvIND pic.twitter.com/qIz6SrZ79Q
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 23, 2020
रणदीव आतंरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त भारतात होणाऱ्या सर्वात मोठ्या अर्थात आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. त्याने 2012 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जसचे प्रतिनिधित्व केलं होतं. तेव्हा चेन्नईने विजेतेपद पटकावलं होतं. यामध्ये रणदीवने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने या मोसमात 8 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात रणदीवने नो बॉल टाकत वीरेंद्र सेहवागला शतक झळकावण्यापासून वंचित ठेवलं होतं. त्याचं झालं असं की, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 171 धावांचे आव्हान दिले होते. हा एकदिवसीय सामना होता. भारताने 4 विकेट्स गमावल्या होत्या.
सेहवाग मैदानात टिकून होता. भारताला 5 धावांची आवश्यकता होती. सेहवाग 95 धावांवर खेळत होता. म्हणजेच टीम इंडियाला विजयासाठी आणि सेहवागला शतकासाठी 5 धावांची गरज होती. सामन्यातील 35 वी ओव्हर रणदीव टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर सेहवागने फोर लगावला. यामुळे सेहवागला शतकासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता होती.
दुसरा आणि तिसरा चेंडू सेहवागने डॉट केला. म्हणजेच या चेंडूवर धाव मिळाली नाही. पण तेव्हा रणदीवने रडीचा डाव केला. पुढील चौथ्या चेंडूवर सेहवागने पुढे येत शानदार सिक्स खेचला. यासह भारताचा विजय झाला. तर सेहवाग शतक पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करु लागला. पण तेवढ्यात फिल्ड अंपायरने हा चेंडू नो बॉल असल्याचा इशारा दिला. रणदीवने सेहवागला शतकापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वर नो बॉल टाकला. यामुळे नो बॉलची धाव ही एक्स्ट्रामध्ये काऊंट झाली. अशामुळे सेहवाग शतकापासून वंचित राहिला. यामुळे सेहवाग 99 धावांवर नाबाद राहिला. या घटनेमुळे भारतीय चाहत्यांना आणि सेहवागला रणदीव चांगलाच लक्षात आहे.
संबंधित बातम्या :
(Former Sri Lankan cricketer Suraj Randiv is working as a bus driver in Australia)