Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ

| Updated on: Apr 09, 2021 | 8:23 PM

राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भर रस्त्यात गाडीमध्ये आरडाओरडा तसेच तोडफोड करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ
राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भर रस्त्यात गाडीमध्ये आरडाओरडा तसेच तोडफोड करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Follow us on

मुंबई : राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा माजी कर्णधार. राहुल द्रविड त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी परिचित आहे. त्याने आपल्या या स्वभावाची मैदानात आणि मैदानाबाहेरही झळक दाखवली आहे. मात्र खुद्द द्रविडने त्याच्या या स्वभावाला छेद दिला आहे. द्रविडने रागाच्या भरात भर रसत्यात चारचाकीचा आरसा (मिरर) फोडला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट केला आहे. द्रविडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (former team india captain rahul dravid is angry in advertisement)

या व्हिडीओमध्ये द्रविड संतापलेला पाहायला मिळतोय. यामध्ये द्रविड दुसऱ्याच्या गाडीचा मिरर फोडताना दिसत आहे. तसेच जोरजोरात आरडाओरडाही करत आहे. खरंतर ही एक जाहीरात आहे. या जाहीरातीचा व्हिडीओ विराटने शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे #RahulDravid हा हॅश्टॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

राहुल द्रविडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

द्रविडने 164 टेस्ट, 344 वनडे आणि 1 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. द्रविडने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात 10 हजारांपेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आगे. द्रविडने 286 कसोटी डावांमध्ये एकूण 13 हजार 288 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने 39.16 च्या सरासरीने 10 हजार 889 धावा केल्या आहेत. तर त्याच्या नावावर एकमेव टी 20 मॅचमध्ये 31 धावांनी नोंद आहे. तसेच द्रविडने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 298 सामन्यात 23 हजार 794 धावा चोपल्या आहेत.

संबंधित बातम्या :

MI vs RCB Live Score, IPL 2021 | ख्रिस लीन-सूर्यकुमार यादवची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

PHOTO | 2 द्विशतक आणि 1 त्रिशतक, कायरन पोलार्डला सलामीच्या सामन्यात अफलातून कारनामा करण्याची संधी

(former team india captain rahul dravid is angry in advertisement)