Windies Cricket :विंडीज टीमची सध्याची अवस्था पाहून माजी विश्वचषक विजेता कर्णधार रडला

| Updated on: Nov 02, 2022 | 8:17 AM

विश्वचषक स्पर्धा विंडीज टीमने दोनवेळा जिंकली आहे.

Windies Cricket :विंडीज टीमची सध्याची अवस्था पाहून माजी विश्वचषक विजेता कर्णधार रडला
Windies Cricket
Image Credit source: twitter
Follow us on

मेलबर्न : विंडीज टीमची (Windies Cricket) सध्याची अवस्था अधिक वाईट आहे. विशेष म्हणजे छोट्या टीमने पराभव केल्यानंतर सुपर 12 च्या राऊंडमध्ये सुद्धा विंडीजची टीम पोहोचू शकली नाही. ज्यावेळी विंडीज टीम बाहेर गेली, त्यावेळी खेळाडूंसह क्रिकेट बोर्डवरती (Cricket Board) अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका केली. टीममध्ये एकहाती विजय खेचून आणण्याची ताकद असणारे खेळाडू असताना अशी परिस्थिती का असाही प्रश्न सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक चाहत्यांनी केला आहे.

विश्वचषक स्पर्धा विंडीज टीमने दोनवेळा जिंकली आहे. 2012 आणि 2016 ला विंडीज टीमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी विश्वचषक जिंकला होता. माजी विश्वचषक विजेत्या कर्णधाराला विंडीज क्रिकेटच्या सद्यस्थितीबद्दल ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आले.

डैरेन सैमी (Darren Sammy) हा पुर्वीपासून जे काही असेल ते स्पष्ट बोलतो. त्याला ज्यावेळी विंडीज टीमबाबत सद्याच्या स्थितीबद्दल प्रश्न केला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

हे सुद्धा वाचा

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या सामन्यांऐवजी फ्रँचायझी लीग खेळण्यास कधीही रोखू शकत नाही. त्याच्या बरोबर उलट टीम इंडिया आहे. टीम इंडियाचं क्रिकेट बोर्ड खेळाडूंना थांबवू शकतं. कारण त्यांच्याकडे पैसा आहे असं सॅनीने स्पष्ट केलं.