दुबई : आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या झिंबाब्वेचा माजी कर्णधार (Zimbabwe) हीथ स्ट्रीकवर 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने ही कारवाई केली आहे. हीथने आयसीसीच्या भ्रष्ट्राचार विरोधातील 5 नियमांचं (ICC Anti Corruption Code) उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्याने नियमांचं उल्लंघन केल्याची कबुली दिली. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (former zimbabwe captain Heath Streak banned for 8 years under icc anti corruption code)
Former Zimbabwe captain Heath Streak has been banned from all cricket for eight years after he accepted five charges of breaching the ICC Anti-Corruption Code: International Cricket Council pic.twitter.com/S1NuVOZAQ2
— ANI (@ANI) April 14, 2021
स्ट्रीकने 2017-18 दरम्यान प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. या दरम्यान अनेक सामने खेळवण्यात आले होते. या सामन्यांसाठी तो संशयाच्या भोवऱ्यात होता.
स्ट्रीक हा अनुभवी आणि माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहिला आहे. त्याने अनेक भ्रष्ट्राचारविरोधी कार्यशाळेत भाग घेतला आहे. त्याला नियामांच उल्लंघने केल्यानंतर काय कारवाई होते, याबाबतची त्याला कल्पना होती, अशी प्रतिक्रिया आयसीसी इंटीग्रिटीचे महाप्रंबंधक एलेक्स मार्शल (Alex Marshall) म्हणाले.
“माजी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून त्याच्यावर खेळात अखंडता राखण्याची जबाबदारी होती. त्याने अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं. त्याने यामध्ये 4 खेळाडूंनाही मदत केली. त्याने या दरम्यान चौकशीत खंड पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला”, असंही एलेक्स यांनी नमूद केलं.
स्ट्रीकवर आयसीसीच्या अनेक नियमांचं उल्लंन केल्याचा आरोप करण्यात आला. यापैकी त्याच्यावर गोपिनय माहिती लीक केल्याचाही ठपका ठेवण्यात आला. या गोपनिय माहितीचा वापर फिक्सिंगसाठी केला जाऊ शकेल, याबाबत त्याला माहिती होती किंवा जाण असायली हवी होती. स्ट्रीकच्या या कालावधीत आंतरराष्ट्रीय , तसेच बीपीएल आणि आयपीएलसारख्या सामन्यांचा समावेश होता.
स्ट्रीकने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप मान्य केले. त्यामुळे स्ट्रीकवर एकूण 8 वर्षांची बंदी घालण्यात आली. यामुळे आता स्ट्रीकला 28 मार्च 2029 रोजी क्रिकेटसंबंधित कोणतीही भूमिका बजावता येणार नाही.
स्ट्रीक 2018 च्या सुरुवातीपर्यंत राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली. मात्र 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिंब्बावेचा पात्रता फेरीत पराभव झाला. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत स्ट्रीकने आपल्या पदाचा राजीनामा दिला.
स्ट्रीकने झिम्बाब्वेचं 65 टेस्ट आणि 189 वनडे सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने एकूण 216 टेस्ट आणि 239 वनडे विकेट्स घेतल्या आहे. तसेच त्याने 1 हजार 990 कसोटी आणि 2 हजार 942 धावाही केल्या आहेत. स्ट्रीकने 2005 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्ट्रीकने 2018 मध्ये आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी बोलिंग कोचचीही जबाबदारी पार पाडली होती.
संबंधित बातम्या :
(former zimbabwe captain Heath Streak banned for 8 years under icc anti corruption code)