टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) मागच्या काही दिवसांपासून मैदानाबाहेरील गोष्टीसाठी अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा क्रिकेट (Cricket) संदर्भात टीका केली आहे. त्याचे पडसाद सुद्धा त्याने चाहत्यांकडून पाहायला मिळाले. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो सध्या अनेक सामन्यात कॉमेट्रीचं काम करीत आहे. आशिया चषक (Asia Cup 2022) ज्यावेळी श्रीलंका संघाने जिंकला त्यावेळी मैदानात उतरल्यानंतर गंभीरने आपल्या हातात श्रीलंकेचा झेंडा घेतला होता.
देशभरात सद्या क्रिकेटच्या सद्या वेगळ्या वेगळ्या लीग सुरु आहेत. अनेक लीग भारतात सुरु आहेत, तर काही लीग परदेशात सुरु आहेत. त्याला अनेक खेळाडूंना सपोर्ट दर्शविला आहे. खेळाडूंना अनेक दिग्गज खेळाडू प्रोत्साहीत करीत आहेत.
त्यावर गौतम गंभीर भडकला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांनी पुढाकार घेतल्याने आता कुणाला बोलायचं असा प्रश्न गंभीरने एका मुलाखतीमध्ये केला आहे.
नियमावलीनुसार कोणालाही क्रिकेट लीगचा प्रचार करण्यास मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्या नियमावलीचं पालन करावं असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांना सुद्धा असा प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही राज्यात असे प्रकार सुरु आहेत.