स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्स मुंसे याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन या संघाकडून खेळताना त्याने केवळ 25 चेंडूत शतक ठोकत विश्वविक्रम केलाय. शिवाय याच सामन्यात त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचाही विक्रम नावावर केला. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हन आणि बाथ सीसी यांच्यात झालेल्या अनौपचारिक टी-20 सामन्यात मुंसे याने 39 चेंडूत 147 धावांची धडाकेबाज खेळी केली.
Unbelievable things happening in our Second XI game against Bath CC.@CricketScotland's George Munsey smashing an astonishing century off just 25 balls??
Scorecard ➡️ https://t.co/tYbP6PflMA https://t.co/EOKlCwnEK4
— Gloucestershire Cricket? (@Gloscricket) April 21, 2019
मुंसेसोबतच त्याचा साथीदार जीपी विलोजनेही 53 चेंडूत शतक ठोकलं. मात्र मुंसेची कामगिरी खास होती. कारण, त्याच्या षटकारांचा पाऊस हा चर्चेचा विषय ठरला होता. त्याने या खेळीत एकूण पाच चौकार आणि तब्बल 20 षटकार ठोकले.
? 147 runs
? 39 balls
? 20 sixes
6️⃣ sixes in an over@CricketScotland's @GeorgeMunsey smashed a 25-ball ? for @Gloscricket Second XI yesterday!READ ?https://t.co/HIDwmBzpKr pic.twitter.com/f2X8yU5q7X
— ICC (@ICC) April 22, 2019
मुंसेने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर त्याने पुढच्या 50 धावा केवळ 8 चेंडूत केल्या. ग्लोसेस्टरशर सेकंड इलेव्हनने या दोन फलंदाजांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 20 षटकांमध्ये 3 बाद 326 धावा केल्या.