T20 World Cup 2022: “या खेळाडूंना तात्काळ संघातून बाहेर काढा”, संतप्त चाहत्यांची बीसीसीआयकडे मागणी

| Updated on: Nov 11, 2022 | 9:12 AM

काल टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव झाला आहे.

T20 World Cup 2022: या खेळाडूंना तात्काळ संघातून बाहेर काढा, संतप्त चाहत्यांची बीसीसीआयकडे मागणी
Team India
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई : सेमीफायनलच्या (Semifinal) महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडकडून (ENG) एडिलेडच्या मैदानात टीम इंडियाचा (IND)पराभव झाल्यानंतर चाहते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांनी थेट या खेळाडूंना टीममधून काढून टाका अशी मागणी बीसीसीआयकडे केली आहे. कालच्या झालेल्या सामन्यात हार्दीक पांड्या आणि विराट कोहली या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. त्यामुळे इतर खेळाडूंवर कालपासून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

काल टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव झाला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या एकाही खेळाडू बाद करता आले नाही. त्यामुळे चाहत्यांनी बीसीसीआयकडे खेळाडूंना तात्काळ बाहेर काढण्याची मागणी केली आहे. रविवारी विश्वचषक स्पर्धेतील फायनल मॅच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.

कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजी अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नावाने अनेक मीम्स फिरत आहेत. विशेष म्हणजे टीम इंडिया चांगले गोलंदाज घ्या अशी मागणी टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी केली होती.

कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादवला बाद करण्यासाठी इंग्लंड टीमने स्पेशल मीटिंग केली होती. कारण सुर्यकुमार यादवने विश्वचषक स्पर्धेत अनेक गोलंदाजांची धुलाई केली आहे.

इंग्लंडच्या टीमची गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा चांगली आहे. कालच्या सामन्यात त्यांनी चांगली खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.