पणजी : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. यामुळेच दोन्ही क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही, फक्त आयसीसीच्या ट्रॉफीमध्येच आमनेसामने येतात. त्यावेळी दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये भर मैदानात कित्येकवेळा हमरीतुमरी पाहायला मिळते तशाच प्रकारे दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर हमरीतुमरी पाहायला मिळते. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गोव्यातील एका व्यक्तीने पाकिस्तान संघाच्या खेळाडूला पाठिंबा दिल्याने माफी मागावी लागत आहे.
गोव्यामध्ये एक ब्लॉगर व्हिडीओ शुट करत होता, तिथे तो एका शॉपवर जातो त्यावेळी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरू होता. त्यावेळी ब्लॉगरने प्रश्न विचारला की, तुम्ही न्यूझीलंड संघाला सपोर्ट करत आहात का? यावर दुकानदाराने, नाही, मी पाकिस्तान संघाला सपोर्ट करत असल्याचं सांगितलं. तुम्ही पाकिस्तान संघाला कसाकाय सपोर्ट करताय अशी विचारणा केली. तर हा मुस्लिम परिसर असल्याचं दुकानदार म्हणाला. ब्लॉगर पण,चकित झाला, भारतामध्ये पाकिस्तान संघाला पाठिंबा देणारा हा चाहता पाहून त्यालाही विशेष वाटलं.
The man who was supporting Pakistan in GOA! pic.twitter.com/Bi4PwIVo0C
— BALA (@erbmjha) February 24, 2023
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गोव्यामधील कैलंगुट या गावातील लोक मिळून संबंधित दुकानदाराजवळ गेले. त्यातील एकाने म्हटलं की, देशाला धर्माच्या आधारावर वाटू नका, यानंतर तिथल्या लोकांनी संबंधित दुकानदाराला गुडघे टेकून देशवासियांची माफी मागायला सांगितली.
भारत आणि पाकिस्तानमधील सामना म्हणजे क्रिकेट प्रेक्षकांसाठी मेजवाणीच असते. हाय-व्होल्टेज सामना चाहत्यांना काहीवेळा श्वास रोखून धरण्याइतका अटीतटीचा होतो. काहीवेळा तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो आणि त्यावर निकाल समोर येतो. तोपर्यंत काही उत्साही चाहते देवाला प्रार्थना करतात तर काही त्यांना पाणयात ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे.
पाकिस्तान देशाकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद्यांना त्यांच्याकडून रसद पुरवली जाते, असे अनेक आरोप त्यांच्यावर उघडपणे केले जातात. भारतामध्ये दहशतवादी हल्ले झाले त्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा समावेश असल्याचं उघड झालं आहे.