सिडनी : पाकिस्तानच्या (Pakistan) भेदक गोलंदाजीपुढे न्यूझिलंडच्या (NZ) फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाहीत. त्यामुळे आजच्या पहिल्या सेमीफायनच्या मॅचमध्ये न्यूझिलंडच्या टीमची धावसंख्या 152 झाली आहे. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात केली आहे. रिझवान-बाबरने (babar azam) चांगली खेळी केल्यामुळे 6 ओव्हरमध्ये पाकिस्तान टीमचं अर्धशतक झालं.
सद्या पाकिस्तान टीमचा आठ ओव्हरचा खेळ संपला आहे. अद्याप पाकिस्तान टीमची एकही विकेट पडलेली नाही. तसेच पाकिस्तानची धावसंख्या 70 झाली आहे. रिझवान 35 धावांवर खेळत आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा सुद्धा 35 धावांवर खेळत आहे.
टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट इत्यादी न्यूझिलंडच्या गोलंदाजांना यश आलेलं नाही.
पाकिस्तानची प्लेइंग इलेवन
मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन
फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट